कोर्टाचा आदर ठेवून नितेश राणे येणार कोर्टासमोर शरण

    दिनांक : 02-Feb-2022
Total Views |
सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधी तीनवेळा जामीन फेटाळल्यांनंतर चौथ्यांदा काल सत्र न्यायालयाने जामीन फेटळला त्यानंतर राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र आज राणेंची वकील सतीश मानेशिंदे यांनी नितेश राणे कोर्टासमोर शरण येणार असल्याची माहिती दिली. तर नितेश राणे शरण आल्यास त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच नितेश राणे यांनी आता एक सूचक ट्विट केलं आहे. अमित शाह यांचा फोटो पोस्ट करत समय बलवान है, असे ट्विट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आल्याने राणेंचा नेमका रोख कुणाकडे आहे? अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 

nitesh2
 
 
 
काय म्हणाले ? नितेश राणे
कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी कोर्टासमोर शरण यायला तयार आहे . आजपर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीररित्या मला अटक करण्याचा प्रयत्न केला, अशी छोटीशी मात्र सूचक प्रतिक्रिया शरण येण्यापूर्वीच नितेश राणे यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे. नितेश राणे यांची कोठडी पोलीस मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. त्यामुळे राणेंना आता कोर्ट कोठडी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.