शेअर बाजारात अस्थिरता, सोन्याचे दरही वाढले

    दिनांक : 18-Feb-2022
Total Views |
नवी दिल्ली : | शेअर बाजार आणि सोन्या-चांदीच्या दराचे गणित विरुद्ध असते. शेअर बाजारात जोरदार तेजी येते तेव्हा सोने-चांदीसारख्या महागड्या धातूंची किंमत घसरते. मात्र शेअर बाजारात अस्थिरता दिसू लागताच इकडे पारंपरिक आणि कायम विश्वासू गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीचे दर वाढतात. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याचे भावही वाढताना दिसत आहेत. भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोने आणि चांदीचे दर वाढलेले दिसून आले. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 50, 214 एवढे नोंदवले गेले. तर चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. एक किलो चांदीचे दर 64,133 रुपयांपर्यंत पोहोचले.
 

god 
 सोने- चांदीचे आजचे दर
नुसार 24 कॅरेट शुद्धता असलेल्या एक तोळा सोन्याचे दर आज 50013 रुपयांपर्यंत पोहोचले. तर 22 कॅरेट शुद्धता असलेल्या सोन्याचे दर 45,996 रुपये झाला आहे. तर एक किलो शुद्ध चांदीचे दरही वाढले असून ते 64133 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

सोने-चांदीच्या दारात झालेली वाढ
सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत असतो. किंबहुना काही मिनिटांच्या अंतरानेही सोन्याच्या दरात घट किंवा वाढ होत असते. पूर्वी सोन्याचे दर दिवसातून दोन वेळाच जाहीर केले जात होते, मात्र आता त्यात सातत्याने बदल होत असतात. आज जारी करण्यात आलेल्या दरांनुसार, कालच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 105 रुपयांनी वाढ झाली. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 96 रुपयाची वाढ झाली. तसेच शुद्ध चांदीच्या दरातही 348 रुपये प्रति किलो अशी वाढ झाली.
असे पहा सोन्या चांदीचे दर
 
हल्ली स्मार्ट फोनमुळे सोन्या-चांदीचे दर तुम्हाला घरातूनही पाहता येतात. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या आणि शनिवार – रविवार वगळला ibja कडून हे दर जाहीर केले जातात. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर काही वेळातच तुमच्या मोबाइलवर सोन्या-चांदीच्या दराचा मेसेज येऊन धडकतो. तसेच आपली माहिती अपडेट ठेवण्यासाठी तुम्ही www.ibja.com किंवा ibjarates.com वरही सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊ शकता.
.