आता स्मार्टफोन द्वारे घरच्या घरी बदला आधार कार्डवरील चुकीचे नाव, पत्ता

    दिनांक : 17-Feb-2022
Total Views |
AADHAR UPDATE :  आता प्रत्येक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड सादर करावेच लागते. यासाठी तुमच्याकडे आधार असणे व त्यावरील माहिती ही अचूक असणे गरजेचे आहे.
 

aadhar1 
आधार कार्डवर व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, पत्ता यासह अनेक माहिती उपलब्ध असते. यापैकी कोणतीही माहिती चुकीची असल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
त्यामुळे जर तुमच्या आधार कार्डवरील एखादी माहिती चुकीची असल्यास त्वरित दुरुस्त करू शकता. त्याबद्दल जाणून घेऊ या सविस्तर माहिती
आधार कार्डवरील नाव बदल -
- यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम ssup.uidai.gov.in वर जावे लागेल
-  येथे अपडेट आधार या पर्यायावर ा.
- त्यानंतर १२ आकडी आधार नंबर टाकून लॉग इन करा.
- त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.
- ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- ज्यात तुमची खासगी माहिती जसे की, पत्ता, जन्मतारीख, नाव आणि लिंग यासह इतर माहिती द्यावी लागेल.
- तुम्हाला जर नावात बदल करायचा असल्यास Name वर ा.
- त्यानंतर बदल करून सबमिट करा.
- सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल.
- हा ओटीपी व्हेरिफाय करून सेव्ह करा.
पत्त्यात असा करा बदल -
-https://uidai.gov.in/ या वेबसाईट वर जा.
- त्यानंतर 'Update Aadhaar' सेक्शनवर ा. पत्ता बदलण्यासाठी 'Update Address in Your Aadhaar' वर ा.
- यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर ड्रॉपडाउन मेन्यूमधून आधार अपडेट या पर्यायावर ून पुढे      जा.
- आता आधार कार्डशी संबंधित अचूक माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करा.
- सर्व माहिती भरल्यानंतर व शुल्क दिल्यानंतर आधार कार्डवरील माहितीत बदल होईल.