शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने मारली उसळी

    दिनांक : 04-Jan-2022
Total Views |
मुंबई : आज शेअर बाजार ने सुरू होताच चांगले संकेत दिले. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्स २०० अंकांनी तर निफ्टी ६२ अंकांनी वधारला. निफ्टीने 17700 चा टप्पा सुरुवातीच्या काही मिनिटांत ओलांडला. निफ्टीने 17700 चा टप्पा 11 डिसेंबरनंतर पुन्हा ओलांडला आहे.
 

share2 
 
 
शेअर बाजार सुरू झाल्यानंतर 97.48 अंक म्हणजे जवळपास 0.16 टक्क्यांनी वधारला. तर, निफ्टी 65 अंकांनी वधारला आणि 17681 अंकावर ट्रेड करत होता.
आज शेअर बाजार सुरू होताच निफ्टीच्या 15 मिनिटात निफ्टी 50 पैकी 35 शेअर वधारले होते. तर 15 स्टॉकमध्ये घसरण दिसून आली.
शेअर बाजारात एनटीपीसी 2.54 टक्के, ओएनजीसी 2.48 टक्के आणि पॉवरग्रीड 1.78 टक्क्यांनी वधारला. बीपीसीएसमध्ये 1.61 टक्के आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा शेअर दर 1.55 टक्क्यांनी वधारला आहे.
 
कोणत्या शेअर्स मध्ये झाली घसरण
 
टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 1.21 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले. एचसीएल टेक 0.9 टक्क्यांनी घसरला. टेक महिंद्रामध्येही विक्री अधिक होत आहे. तर, आयशर मोटर्समध्ये ही 0.49 टक्क्यांनी घसरला आहे.
 
प्री-मार्केटमध्ये आज बाजाराची काय होती स्थिती ?
 
प्री-मार्केटमध्ये शेअर बाजारातही सकारात्मक ट्रेंड दिसून आला., बीएसई सेन्सेक्स 160.57 अंकांच्या वाढीसह 59,343 वर ट्रेड करत होता. तर, निफ्टी 50 अंकांनी वधारला होता.
 
नव्या वर्षात दमदार सुरुवात
 
नव्या वर्षातल्या व्यवहाराचे पहिल्या दिवसाचे शेअर बाजाराने जोरदार स्वागत केले. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, कच्च्या तेलाच्या दरात वाढ आणि परदेशी बाजारातून कोणतेही सकारात्मक संकेत नसताना सेनसेक्स आणि निफ्टी चांगलाच वधारला. सेन्सेक्स जवळपास 850 अंकांनी वधारला. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 940 अंकांनी वधारत 59,191 अंकावर ट्रेड करत होता. तर, निफ्टी 17,624 अंकावर ट्रे़ड करत होता. निफ्टी हा 270 अंकांनी वधारला होता.