दुकानात दारु विकून पैसा उभा हे या राज्य सरकारला पचनी पडलेलं नाही; रावसाहेब दानवे

    दिनांक : 29-Jan-2022
Total Views |
पुणे – राज्य सरकारमध्ये काय गोंधळ चाललाय हे सरकार मधल्यांनाही कळत नाही. अन जनतेलाही कळत नाही. काही जिल्हे आम्ही दारूमुक्त केले होते. चंद्रपूरमध्ये आम्ही दारूबंदी केली, हे सरकार सत्तेवर आलं नाही तोपर्यंत दारुविक्री पुन्हा सुरू केली. आता केवळ चंद्रपूरला दारु सुरु करून थांबले नाहीत, तर सगळ्या महाराष्ट्रात पानटपरीवर वाईन विकायला लागलेत. अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यसरकारावर केली आहे. आज वाईन विकायला लागेलत, उद्या बियर विकतील, पुढे दारु विकायला लागतील. या सरकारला उत्पन्न पाहिजे असेल तर अनेक उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
 

danave 
 
 
पानटपरीवर दारु विकून किंवा दुकानात विकून पैसा उभा हे या राज्य सरकारला पचनी पडलेलं नाही. महाराष्ट्रातील संस्कृती अशी नाहीये, राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे अजित पवार काय बोलले मला माहिती नाही पण वाईन मध्येही अल्कोहोल असतं. उद्या ते असही म्हणतील की महिलाही पिल्या तरी चालतील. आमच्या सरकारने कोणत्याही राज्यात दारु विक्रीचा निर्णय घेतलेला नाही आणि घेणारही नाही असेही ते म्हणले आहेत.
 
आमदार निलंबनावर सरकारला चपराक
निलंबित आमदाराच्या बाबत निर्णय देऊन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारलाचांगलीच चपराक दिली आहे. घटनाबाह्य काम राज्य सरकारने केलं हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटीवर केलेल्या वक्तवाचाही दानवे यांनी समाचार घेतला आहे. हिशोब काढला तर राज्याची पंचायत होऊन जाईल. मी कोळसामंत्री आहे, 3 हजार कोटी कोळस्याचे राज्याकडे आहे. आम्ही कधी म्हटलो नाही, आणि कोळसा थांबवला नाही. राज्याने केंद्राला काय मदत केली, राज्याने केंद्राला किती द्यायचेत हिशोब काढला तर राज्याची पंचायत होऊन जाईल. फक्त महाराष्ट्राला पैसे दिले नाहीत, अस नाहीये, जीएसटीचे पैसे देण्याची पद्धत आहे त्यापद्धतीने ते दिले जात आहेत.