पाकिस्थानात दहशदवादी हल्ला ...10 सैनिकांचा मृत्यू

    दिनांक : 28-Jan-2022
Total Views |

बलुचिस्तान : Terrorist attack पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 10 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

pakisthan 
 

 

लष्कराच्या मीडिया विंगनं एका निवेदनात म्हटलं आहे की, ही घटना 25 ते 26 जानेवारीच्या मध्यरात्री घडली, ज्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला आणि अनेक जण जखमी झाले. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी सांगितले की, गुरुवारी बलुचिस्तानच्या केच जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर गोळीबार केला.
 

Terrorist attack एका वृत्तानुसार, सुरक्षा दलांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना पकडले आहे, तर ते अद्याप या घटनेत सहभागी असलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. आपल्या भूमीतून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सशस्त्र दल कटिबद्ध आहे, त्यासाठीकोणतीही किंमत मोजायला पाकिस्तान तयार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केलेला तालिबान पाकिस्तानसाठी वाईट ठरत आहे. पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडी (PICSS)च्या अहवालात म्हटलं आहे की, 10 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत एक महिन्याचा युद्धविराम असूनही दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. पाकिस्तानमध्ये दर महिन्याला होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची सरासरी संख्या 2020 मधील 16 वरून 2021 मध्ये 25 पर्यंत वाढली आहे, जी 2017 नंतर सर्वाधिक आहे.