पाकिस्तानातील हिंगलाज माता मंदिराला मुस्लिम कट्टरपंथीयांनी केले उद्ध्वस्त, गेल्या २२ महिन्यांत ११ वा हल्ला

    दिनांक : 26-Jan-2022
Total Views |
सिंध : इम्रान खानच्या सर्व दाव्यांच्या उलट पाकिस्तानमधील मुस्लिम कट्टरतावाद्यांनी पुन्हा एकदा पाकिस्थानातील एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थार पारकर जिल्ह्यातील खत्री मोहल्ला येथील हिंगलाज माता मंदिराला रविवारी मुस्लीम कट्टरवाद्यांनी लक्ष्य करून उद्ध्वस्त केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या २२ महिन्यांतील पाकिस्तानमधील हिंदू मंदिरांवर झालेला हा ११ वा हल्ला आहे.

 
Hinglaj Mata Pak
 
या हल्ल्यानंतर पाकिस्तान हिंदू मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष कृष्ण शर्मा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांतले की, इस्लामिक कट्टरपंथी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाला आणि पाकिस्तान सरकारला घाबरत नाहीत. दरम्यान, मंदिरावरील हल्ल्याच्या विरोधात हिंदूंनी निषेध मोर्चा काढला आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांना मुस्लीम कट्टरवाद्यांकडून अनेकदा लक्ष्य केले जाते. असे असताना इम्रान सरकारने अल्पसंख्याकांना संरक्षण दिले जाईल, असा दावा केला होता.

अल्पसंख्याकांसाठी पाकिस्तान बनला नरक 

या हल्ल्यानंतर जगभरातून जोरदार टीका झाली, त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी २४ तासांनंतर मौन सोडले. आपले सरकार या मंदिराचा जीर्णोद्धार करेल, असे आश्वासनही इम्रान खान यांनी दिले आहे. याआधीही इम्रान खान यांनी इस्लामाबादमध्ये मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते, मात्र कट्टरवाद्यांच्या विरोधामुळे त्यांनी ते वचन मोडले. मानवाधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की पाकिस्तान अल्पसंख्याक लोकांसाठी नरक बनला आहे आणि त्याची सुरुवात स्वातंत्र्यानंतरच झाली. त्यांनी सांगितले की, १९४७ मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी २३ टक्के लोक हिंदू, ख्रिश्चन, शीख या अल्पसंख्याक होते.

२०१७ च्या जनगणनेनुसार, पाकिस्तानमध्ये आता ९६.२८% मुस्लिम आहेत आणि केवळ ३.७२% अल्पसंख्याक किंवा गैर-मुस्लिम आहेत. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि धर्मांतर हे त्या कारखान्याचे फलित आहे, जिथे मुस्लिमांची लोकसंख्या सतत वाढत गेली.