सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्सची 600 अंकांनी घसरण !

    दिनांक : 24-Jan-2022
Total Views |
मुंबई : जागतिक बाजारपेठेतील धोरणांचा थेट परिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिसून आला. देशांतर्गत शेअर बाजाराला कमकुवत सुरुवात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) 661 अंकांनी अथवा 1.12 टक्क्यांनी घसरून 58,375.76 अंकावर स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी 210 अंकांनी घसरून 17,407अंकावर आला. आयटी, मेटल, ऑटो, फार्मा आणि रिअल्टीसह सर्व क्षेत्राचा रोख विक्रीकडे असल्याने बाजारपेठेत दबाव निर्माण झाला. बाजारातील तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. गुंतवणुकदारांना 5.28 लाख कोटी रुपयांचा फटका बसला. वर्षाच्या सुरुवातीला दणकेबाज सुरुवातीनंतर बाजाराला उतरती कळा लागली. आज सरर्वच शेअर निर्देशांक निगेटिव्ह दिशेने धावत आहेत. त्यामुळे गुंतवणुकदार काळजीत पडले आहे.सध्या सर्वात मोठी घसरण आयटी, मेटल, रिअल्टी आणि ऑटो निर्देशांकांमध्ये आहे. या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची स्पष्ट तूट दिसून आली. 
 

share market 
 
 
 
5 दिवसांत 15 लाख कोटी रुपये बुडाले
 
सलग पाच व्यापारी सत्रांमध्ये बाजारात सातत्याने झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फटका बसला. गुंतवणूकदारांनी सोमवारीच 5.30 लाख कोटी रुपयांहून अधिक गमावले. शुक्रवारी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांची एकूण बाजार मर्यादा 2,69,65,801.54 कोटी रुपये होती, जी 5,31,576.05 कोटी रुपयांनी घसरून आज 2,64,34,225.49 कोटी रुपयांवर आली आहे.
 
बजाज फायनान्सने सुरुवातीलाच सर्वाधिक 3.75 टक्के घट नोंदविली. याशिवाय विप्रो, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, इन्फोसिस, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपटी दिसून आली. दुसरीकडे सन फार्मा, भारती एअरटेल, इन्डसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी या शेअर्समध्ये या गडबडीत ही तेजीचा आलेख चढता ठेवला.
गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 2,185.85 अंकांनी किंवा 3.57 टक्क्यांनी घसरला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये निफ्टीत 638.60 अंकांनी म्हणजेच 3.49 टक्क्यांनी घट झाली. शेअर बाजारात जोरदार घसरण होत असताना देशातील पहिल्या 10 कंपन्यांचे बाजार भांडवल एकत्रितपणे 2,53,394.63 कोटी रुपयांनी घसरले.
 
आर्थिक सर्वेक्षणानुसार विकास दर राहिल 9%
 
अर्थ मंत्रालय 21-22 साठी आर्थिक सर्वेक्षण एक अंकी वृध्दी नोंदवणार आहे. परिणामी पुढील आर्थिक वर्षासाठी सुमारे 9 टक्के वाढ होईल. एनएसओच्या प्रगत अंदाजानुसार, अर्थव्यवस्थेत चालू तिमाहीत 9.2 टक्के वाढ नोंदण्याची शक्यता आहे. भारतीय रिर्झव्ह बँकेच्या 9.5 टक्क्यांच्या अपेक्षित अंदाजापेक्षा हे प्रमाण थोडे कमी आहे.
 
कोरोना साथीचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे 2020=21 दरम्यान अर्थव्यवस्थेत 7.3 टक्क्यांची घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात कोरानाचा प्रादुर्भाव कमी होऊन अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम तुलनेने कमी होण्याची शक्यता आहे. मध्यतंरी महामारीचा परिणाम कमी झाल्याने औद्योगिक वसाहतीत उत्पादन सुरू झाले. सध्या ही औद्योगिक परिसरातील उद्योग विना अडथळा सुरू आहे.