भारत-पाकिस्तान दरम्यान एक नवा इतिहास ;स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच... पाकिस्तानातून हवाईमार्गाने येणार पर्यटक

    दिनांक : 24-Jan-2022
Total Views |
इस्लामाबाद : भारत-पाकिस्तान दरम्यान एक नवा इतिहास तयार होतो आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानातून एक विमान प्रवाशांना सोबत घेऊन भारतात दाखल होणार आहे.
 

hawai 
 
 
यामुळे, भारत-पाकिस्तान दरम्यान हवाई मार्गाने प्रवास खुला होतो आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला भारतीय यात्रेकरू विमानाने  पाकिस्तानात दाखल झाले होते. त्यानंतर आता गेल्या 75 वर्षांत पहिल्यांदाच पाकिस्तानी पर्यटक विमानाने भारतात दाखल होणार आहेत.
 
29 जानेवारी रोजी 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स'च्या विशेष विमानाने भारतात दाखल होणार आहेत. भारत-पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत यात्रेकरू किंवा पर्यटकांना उभयदेशांत पायी किंवा 'समझौता एक्स्प्रेस'ने जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. दोन शेजारी देशांमधील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स' आणि 'एअर इंडिया' यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार ही सेवा सुरू होत असल्याचे सांगत Pakistan Tourists पाकिस्तान संसदेचे सदस्य आणि 'पाकिस्तान हिंदू परिषदे'चे अध्यक्ष रमेश कुमार यांनी आनंद व्यक्त केला आहे.
 
संबंधित करारानुसार दोन्ही विमान कंपन्या यासंदर्भात विशेष उड्डाणं संचालित करतील. याच साखळीत Pakistan Tourists पाकिस्तानी पर्यटकांचा एक गट 29 जानेवारी रोजी लाहोर विमानतळावरून भारतात दाखल होणार आहे. फेब्रुवारी रोजी हा गट पाकिस्तानला परतणार आहे. तीन दिवसांच्या दौर्‍यात हे पर्यटक अजमेर शरीफ, जयपूर, आग्रा, मथुरा, हरिद्वार इथल्या सुफी संत 'वाजा मोईनुद्दीन चिश्ती आणि दिल्लीतील हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यांना भेट देणार आहे.
 
पर्यटक मोजणार लाखभर रुपये
डॉ. रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान-भारताच्या या Pakistan Tourists दौर्‍यासाठी प्रत्येक यात्रेकरूला जवळपास 1500 डॉलर (एक लाखांपेक्षा जास्त) मोजावे लागणार आहेत. आग्रा आणि दिल्लीतील वास्तव्यादरम्यान त्यांना वेगळी खोली हवी असेल, तर त्यासाठी त्यांना अतिरिक्त 200 डॉलर म्हणजे जवळपास 15 हजार रुपये द्यावे लागतील. 1974 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या करारानुसार यात्रेकरू किंवा पर्यटक उभय देशांच्या धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतात. वक्फ मालमत्ता मंडळ आणि धार्मिक व्यवहार मंत्रालयाकडून यात्रेकरूंच्या येण्या-जाण्याची व्यवस्था केली जाते.