बारामतीतील सराफा व्यवसायिकाच्या कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू

    दिनांक : 19-Jan-2022
Total Views |
पुणे :  उसाच्या ट्रॉलीला भरधाव कराची धडक बसून भीषण अपघातात बारामतीतील प्रसिद्ध सराफा व्यापारी व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. . बारामती-मोरगाव रस्त्यावर तरडोलीनजिक हा अपघात झाला आहे.
 
तरडोलीपासून पुढे आल्यानंतर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने मागून गाडी धडकली . त्याने हा अपघात झाला. गाडीची धडक जोरदार होती. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला यात गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताने भंडारी व कळसकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे
 


Accident
 
 
 
या अपघातात पत्नी अश्विनी भंडारी, मुलगा मिलिंद भंडारी व बहिण, बारामतीतील व्यापारी उदय कळसकर यांची पत्नी कविता कळसकर यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
 
भंडारी कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्याला गेले होते. . कार्यक्रम संपवून बारामतीला निघालेले असताना तरडोलीपासून पुढे आल्यानंतर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने मागून गाडी धडकली. त्याने हा अपघात झाला. गाडीची धडक जोरदार होती. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला यात गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताने भंडारी व कळसकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. बारामती परिसरात धार्मिक कुटुंब म्हणून त्यांची ओळख होती. रात्री अपघाताची माहिती मिळताच बारामतीतील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.