चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार : मृतांची संख्या २३४५ वर!

    दिनांक : 19-Jan-2022
Total Views |
वुहान : कोरोनाचे उगमस्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा या विषाणूने थैमान घातल्याचे दिसत आहे. चीनमध्ये कोविडच्या तिसऱ्या लाटेत दगावलेल्यांची संख्या २ हजार ३४५ वर पोहोचली आहे. मंगळवारी जाहिर झालेल्या आकडेवारीनुसार यात १०९ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याचबरोबर आणखी ३९७ जणांना कोविडची लागण झाल्याचंही स्पष्ट झाले आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सध्या ७६ हजार २८८ वर पोहोचली आहे.
 

CHINA CORONA THIRD WAVE