शाहिस्तेखानाची फक्त बोटे छाटली, नाना पटोलेंनी आपला पंजा सांभाळावा; अनिल बोंडेंचा इशारा

    दिनांक : 18-Jan-2022
Total Views |
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झाले आहेत.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळं भाजप आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी माजी कृषी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करताना वादग्रस्त शब्द वापरले आहेत. काँग्रेस नेत्यांमध्ये कुत्र्यांसारखी भुंकायची स्पर्धा लागली आहे. सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे. “नाना पटोले याने तर हद्दच केली मी मालकीणीचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे. म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली. पण, नानांनी लक्षात ठेवावं शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल.”, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोर निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव, असा इशारा बोंडे यांनी दिला आहे.
 

anil bonde-nana patole 
 
 
तुमचा पंजा छाटला जाईल, अनिल बोंडेंचा इशारा
 
काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुत्र्यासारखं भुंकायची स्पर्धा लागली आहे. नाना पटोलेंना मी सांगून ठेवतो, तुम्ही म्हणता मोदींना मारु शकतो. तर, तुमचा पंजा छाटला जाईल. नाना पटोलेंनी गमजा करु नये. काँग्रेस नेत्यांना मोदींजींच्या नखाची सर तरी येते का? पालकमंत्री छप्पन इंच छाती म्हणतात. विधानसभेत नखला करतात.
 
पोलीस, गृहमंत्री गेलेत कुठे?
 
काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नरेंद्र मोदींना मारू शकतो असं म्हणत असेल तर त्या कुत्र्याला दांडक मारायला काय हरकत आहे. नारायण राणेंना अटक करतात. नितेश राणेंवर कारवाई करतात. नाना पटोले बोलल्यावर कुठं गेली पोलीस, कुठं गेले गृहमंत्री असा सवाल अनिल बोंडे यांनी केला. नाना पटोले यांचं सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी वक्तव्य आहे. काँग्रेसला दुखावू नये म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी साथ देत आहे .नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदीला मारतो म्हणत असेल तर त्याला अटक केली पाहिजे, असं अनिल बोंडे म्हणाले. पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा अमरावतीतून मुलं निघाली आहेत. त्यांनी जपून राहावं, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला.
 
नाना पटोलेंच वादग्रस्त वक्तव्य
 
“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.