निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरातून लढणार

    दिनांक : 15-Jan-2022
Total Views |
 
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने आज पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी निवडणूक होत आहे.
 

yogiji 
 
 
भाजपने आज आपल्या निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या बैठकीत 170 जागांवरील उमेदवारांच्या नावासाठी चर्चा झाली होती. अखेर भाजपने 105 नावांची घोषणा केली आहे.भाजपने आज पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी भाजपने 57 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी निवडणूक होत असून भाजपने दुसऱ्या टप्प्यातील 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एकूण भाजपने आज 105 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.