Thursday, 21 August, 2025

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

सेन्सेक्स पहिल्यांदाच 55,000 उच्चांकावर

    दिनांक : 13-Aug-2021
Total Views | 70
मुंबई : आज दिवसभरात सेन्सेक्सने सर्वकालिन उच्चांकाला गवसणी घालत 55,487.79 चा आकडा गाठला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँकांच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाल्याचा परिणाम सेंसेक्सवर जाणवला आहे. एवढा की 593 अंकांच्या वाढीने सेन्सेक्स पहिल्यांदाच 55,437.29 चा विक्रमी आकडा गाठून बंद झाला आहे. बीएसईचा 30 शेअरचा सेन्सेक्सने आज 1.08 टक्क्यांची झेप घेतली. हा सेन्सेक्सचा सर्वाधिक बंद होण्याचा उच्चांक आहे.
 

share_1  H x W: 
 
निफ्टीने देखील पहिल्यांदाच 16,500 अंकांच्या वर झेप घेतली. निफ्टीदेखील 164.70 अंकांनी उसळून म्हणजेच 1.01 टक्क्यांनी वाढून सर्वकालिन उच्चांक गाठला. सेन्सेक्समध्ये टीसीएसच्या शेअरने चांगली कामगिरी केली. सोबत लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल, एचसीएल टेक, टाटा स्टील, बजाज ऑटो आणि रिलायन्सने देखील वाढ नोंदविली.
अन्य आशियाई बाजारांमध्ये चीनच्या शांघाई कम्पोजिट, हाँगकाँगच्या हँगसेन, जपानच्या निक्की आणि दक्षिण कोरियाच्या कॉस्पी येथे घसरण नोंदविण्यात आली. दुपारच्या कामकाजात युरोपिय़ बाजारात सकारात्मकता दिसली. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट कच्चे तेल 0.10 टक्क्यांनी घसरून 71.24 डॉलर प्रति बॅरलवर आले. देशातील सर्वाती मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) शुक्रवारी बीएसईवर 4 टक्क्यांची वाढ नोंदविली. यामुळे टीसीएसचा शेअर ऑल टाईम हाय 3,479.35 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी या शेअरने 25 जूनला 3399 रुपयांची उंची गाठली होती. यामुळे टीसीएसचे बाजारमुल्य देखील 13 लाख कोटींच्या जवळ जाऊन पोहोचले आहे.
अन्य बातम्या