नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फुलला सराफ बाजार

    दिनांक : 30-Dec-2021
Total Views |
मुंबई : नवीन वर्षाच्यास्वागतासाठी सराफा बाजारातही लगबग दिसून येत आहे. तसेच सोन्याच्या दागिन्यांना लग्नसराईमुळे मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहे . आज सोन्याचे भाव स्थिर होते तर चांदीच्या दरात घसरण झाली. बुधवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 48000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 49000 प्रति 10 ग्रॅम आहे.
 
 

gold 
 
 
22 कॅरेट सोन्याची किंमत
30 डिसेंबर रोजी मुंबई सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48000 होती. तसेच 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49000 रुपये होता.
चांदीची किंमत
 
मुंबईतील आजचे चांदीचे दर 61,600 रुपये किलो इतके होते. काल मुंबईत चांदीचे दर 62500 प्रति किलो इतकी होती.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे
 
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.
गेल्या वर्षी सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली होती. कोरोना संकटकाळात गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर दर 55 हजार प्रतितोळेच्या उच्चांकी पातळीवर पोहचले होते.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX मध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत सोन्याचे दर प्रती तोळे 47645 रुपये इतकी ट्रेड करीत होती. तर चांदीचे दर 61492 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते.
सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे सोने - चांदीचे रोजचे दर किती याबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता असते.