शेअर बाजारात तेजी कायम, निफ्टी-BSE मध्येही झाली वाढ

    दिनांक : 27-Dec-2021
Total Views |
नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीच्या घसरणीनंतर भारतीय बाजारांनी जबरदस्त रिकव्हरी दाखवली. बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत होते.
 
सोमवारी बीएसई सेन्सेक्स 295.93 अंकांच्या किंवा 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 57,420.24 च्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, NSE चा प्रमुख इंडेक्स निफ्टी 82.50 अंकांच्या किंवा 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 17,086.25 वर बंद झाला. बँक निफ्टी 0.58 टक्के किंवा 200.80 अंकांच्या वाढीसह 35057.90 वर बंद झाला.
 
 

bajar_1 
 
 
आज सेन्सेक्सच्या टॉप-30 शेअर्स मध्ये टेक महिंद्रा टॉप गेनर ठरला. टेक महिंद्राचा शेअर 3.53 टक्क्यांच्या वाढीसह 1784 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय डॉ रेड्डी, पॉवर ग्रिड, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एम अँड एम, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, टीसीएस, बजाज फिन, टायटन, एसबीआय, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, एलटी. , हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो आणि आयटीसी ग्रीन मार्कमध्ये बंद झाले. 
 
फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. आयटी इंडेक्स विक्रमी पातळीवर बंद झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये जरी मेटल आणि एफएमसीजी शेअर्सवर दबाव होता तरी रिअ‍ॅल्टी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सही वाढीसह बंद झाले.
आज 5 कंपन्यांचे शेअर्स ग्रीन मार्कमध्ये बंद झाले. एशियन पेंट्स टॉप लुझर ठरला. यामध्ये 0.59 टक्के घट झाली आहे. याशिवाय इंडसइंड बँक, मारुती, रिलायन्स आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्येही घसरण झाली.