सोन्याच्या दारात वाढ ;चांदीही १००० रुपयांनी महागली

    दिनांक : 17-Dec-2021
Total Views |
मुंबई : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. या दिवसांत सोन्याच्या खरेदीत वाढ होते. मात्र गेल्या काही दिवसाची सोन्याची चमक महागली आहे. आजही सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. आज सोन्याच्या दरात 398 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात 1033 रुपये प्रति किलोने मोठी वाढ झाली आहे.
 
gold-1_1  H x W 
 
 
राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 398 रुपयांनी वाढून 47,762 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 1,033 रुपयांनी वाढून 61,147 रुपये प्रतिकिलो झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोने 47,364 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 60,114 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
 
सोन्याचा भाव कसा पाहावा?
 
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
 
 
Advt_1  H x W:
 
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
 
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.