अमरावती पुन्हा एकदा जमावबंदी...तर होणार कारवाई

    दिनांक : 22-Nov-2021
Total Views |
अमरावती : आज होणाऱ्या भाजप (BJP)आणि वंचितच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती प्रशासनानं जमाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.शहरात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त नागरिक बाहेर दिल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. दरम्यान आज शहरातील बाजार पेठ सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी हा सुधारित आदेश जारी केला आहे.
amaravati_1  H  
 
काही दिवसांपूर्वी अमरावतीत त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद उमटलेले दिसले. अमरातवीत बंदला हिंसक वळण लागून हिंसाचाराचं वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अमरावतीमध्ये कलम 144 लागू करुन जमाबंदीचे आदेश देण्यात आले होते. भाजपान केलेल्या बंदच्या आवाहनला हिंसक वळण लागलं होतं. आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड देखील केली होती. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.