एकतर्फी कारवाई न थांबल्यास जेलभरो

- देवेंद्र फडणवीस यांची अमरावतीत घोषणा

    दिनांक : 21-Nov-2021
Total Views |
अमरावती : अमरावती शहरात 12 नोव्हेंबरला झालेला हिंसाचार दुर्लक्षित करून 13 नोव्हेंबरची घटना केंद्रस्थानी ठेवून सुरू असलेली कारवाई संतापजनक आहे. ही कारवाई न थांबल्यास भाजपा जेलभरो आंदोलन करेल अशी घोषणा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणीस यांनी रविवारी केली.
jelabharo_1  H
अमरावतीत 12 व 13 नोव्हेंबरला झालेल्या घटनेच्या पृष्ठभूमीवर देवेंद्र फडणवीस रविवारी दौऱ्यावर आले होते. त्यांनी सुरुवातीला दंगलग्रस्त व्यापाऱ्यांशी व दंगलग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी स्थानिक विश्राम भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, 12 नोव्हेंबरला नाशिक, मालेगाव, अमरावती या ठिकाणी निघालेले मोर्चे हे नियोजित षडयंत्राचा भाग होते. या षड्यंत्राची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
अमरावती ज्या प्रकारे हिंसाचार झाला तो व्यथित करणार आहे. राज्य सरकार त्या घटनेवर चिडीचुप आहे यावरून मोठा संशय निर्माण होतो आहे. 13 तारखेला जी घटना झाली ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. 12 ला घटना घडलीच नसती तर 13 ची घटना झालीच नसती. आता पोलीस प्रशासन 12 तारखेची घटना दुर्लक्षित करून 13 तारखेच्या घटनेला आज केंद्रस्थानी ठेवत कारवाई करीत आहे. अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपा हे कदापि सहन करणार नाही. पोलीस प्रशासनाला याची जाणीव करून दिली आहे.
प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करीत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना होत असलेल्या कारवाईबद्दल मी अवगत करणार आहे. एकतर्फी कारवाई न थांबल्यास भाजपाला नाईलाजाने रस्त्यावर उतरून जलभरो आंदोलन करावे लागेल. रजा अकादमी भाजपाचे बी टीम आहे, असा आरोप जे कोणी करत आहे त्यांनी मग रजा अकादमीवर बंदी टाकावी, अशी आमची मागणी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला भाजपाचे नेते उपस्थित होते.