नाशिकमध्ये गोळीबाराची प्रात्याक्षिके, 'या' ठिकाणी जाण्यास मनाई

    दिनांक : 02-Oct-2021
Total Views |
नाशिक :  नाशिक जिल्ह्यात जनरल स्टाफ ऑफिसर ट्रेनिंग मुख्यालय तोफखाना यांच्या मार्फत देवळाली कॅम्प आर्टिलरी स्कूल तर्फे इगतपुरी व नाशिक तालुक्यातील एक्स सेक्टर येथे गोळीबाराची प्रात्याक्षिके केली जाणार आहे. ५ ऑक्टोबरला हे गोळाबाराची प्रात्यक्षिके होणार असून, इगतपुरी आणि नाशिक तालुक्यातील एक्स सेक्टर या ठिकाणी जाण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.
 

nashik_1  H x W 
प्रात्यक्षिके करण्यात येणाऱ्या भागामध्ये संबंधित एक्स सेक्टर या गावातील नागरीकांना प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या क्षेत्रात जनावरांना जाऊ देवू नये, याबाबत संबंधित गावांमध्ये जाहीर सूचना देण्यात आली आहे. प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहणार नाही. सदर सूचनेचा भंग केल्यास त्या व्यक्तिविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडून करण्यात आले आहेत.
प्रात्यक्षिके सुरु असतांना प्रतिबंधित क्षेत्रात गेल्यास व्यक्तीला गंभीर इजा होऊ शकते. तसेच एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. लहान मुले आणि शेतात जाण्यासाठी गेलेल्या व्यक्तींनीही खबरदारी घ्यावी. मनाई केलेल्या वेळेत या भागात कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच या सूचना भंग केल्यास त्या व्यक्तिविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.