७३ ग्रामपंचायतींवर प्रशासकाचे राज

    दिनांक : 06-Sep-2020
Total Views |

jamner _1  H x
जामनेर तालुक्यात सर्वच पक्ष पदाधिकार्‍यांची गोची,
लवरकच विराजमान होणार प्रशासक
जामनेर, ६ सप्टेंबर
१२ सप्टेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या कार्यकाळाची मुदत संपणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. यात विस्तार अधिकारी, अंगणवाडी प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, जि.प.शाळांचे मुख्याध्यापक, पंचायत, कृषी व सांख्यिकी अधिकारी आणि कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.
 
 
एकंदरीत या निर्णयामुळे राजकीय पदाधिकार्‍याची गोची झाली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान संपणार आहे. त्याठिकाणी निवडणुका न घेता प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे, असा शासन निर्णय यापूर्वीच शासनाने काढलेला आहे. मात्र, या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक न करता निवडून आलेला सरपंच किंवा राजकिय पदाधिकार्‍यांना या पदावर संधी द्यावी, अशी मागणी स्थानिक लोकांनी शासनाकडे केली होती. मात्र ही मागणी शासनाने मान्य केली नाही.त्यामुळे अनेकांना दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. मात्र न्यायालयाने याबाबत शासनाचे आदेश जैसेथे ठेवण्यात यावेत, असा निर्णय दिला. त्यामुळे आता पालकमंत्री व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांच्या आदेशावरून त्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे.
 
 
यात विस्तार अधिकारी, अंगणवाडी प्रकल्प अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, जि. प.शाळांचे मुख्याध्यापक, पंचायत, कृषी व सांख्यिकी अधिकारी आणि कृषी अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. ११ सप्टेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान तालुक्यातील ७३ग्रामपंचायतींच्या कार्यकाळाची मुदत संपणार आहे.त्यामुळे या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. शासनाच्या निर्णयामुळे आणि न्यायालयाच्या निकालामुळे ग्रामीण भागातील शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप, मनसेसह इतर पक्षांच्या पदाधिकार्‍यांची गोची झाली आहे. फत्तेपूर, नेरीदिगर, नेरी बुद्रुक, तोंडापूर, पहुर कसबे, नाचणखेडा, तळेगाव, शेळगाव, सोनाळा, वाकी, वाकोद, देऊळगाव, सुनसगाव, पळासखेडा, अंबिलहोळ, भराडी, टाकरखेडा आदीसह ७३ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे.