कोरोना कहर : जिल्ह्यात आढळले नवे ७७३ रुग्ण

    दिनांक : 06-Sep-2020
Total Views |

dfnk_1  H x W:
 
जळगाव : जिल्ह्यात रविवारी ७७३ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक १९६ रुग्ण अमळनेर शहरातील आहेत. दिवसभरात ४६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या ३२ हजार ४३३ एवढी झाली आहे. जिल्ह्यात रविवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ४३ , जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ६८, अमळनेर १९६, चोपडा ६९, पाचोरा ७४, भडगाव १६, धरणगाव २९ , यावल ३८, एरंडोल ३६, जामनेर ४६, रावेर ७५, पारोळा ३६, चाळीसगाव २५, मुक्ताईनगर ०६, बोदवड १०, इतर जिल्ह्यातील १ अशी रूग्ण संख्या आहे.
 
दिवसभरात १३ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहर चार, भुसावळ चार, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली.