पॉझिटिव्ह रुग्णाला परस्पर हलविल्यामुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ

    दिनांक : 05-Sep-2020
Total Views |
एमआयडीसी पोलिसात तक्रार; नातेवाईकांना संपर्क केल्यानंतर प्रकार उघडकीस

civil_1  H x W:
 
जळगाव : शिरसोली येथील ४५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर ती महिलेचा रुग्णालयात राहण्यास नकार दिला. यामुळे त्या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करणयासाठी परस्पर घेवून गेल्याने जिल्हा रुग्णालयातून महिला बेपत्ता झाल्याचे सांगत गोंधळ निर्माण झाला होता.
 
तालुक्यातील शिरसोली येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या महिलेला वार्ड क्रमांक १० मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र ही महिला रुग्णालयात राहण्यास नकार देत असल्याने नातेवाईकांनी त्या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्या महिलेच्या कुटुंबियांना खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी ट्रान्सफर लेटर घेवून येण्यास सांगितले.
 
नातेवाईकांना परस्पर हलविल्याले गोंधळ
रुग्णाच्या नातेवाईकाला खासगी रुग्णालयात हलविण्याबाबत संबंधित रुग्णालयातून ट्रान्सफर लेटर आणण्यास सांगितले. परंतु नातेवाईकांनी थेट त्या महिलेलाच खासगी रुग्णालयात हलविल्यामूळ रुग्णालयातून महिला बेपत्ता झाल्याचे सांगत गोंधळ निर्माण झाला.
 
फोन केल्यानंतर उघडकीस आला प्रकार
एमआयडीसी पोलिसात रुग्णालयातून बेपत्ता झाल्याची तक्रार झाली. यावेळी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क केला असता. त्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजले. आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.