जिल्ह्यात नवे ७५३ बाधित

    दिनांक : 03-Sep-2020
Total Views |
जळगावात ११५ रुग्णांची भर, ५१३ कोरोनामुक्त
 

corona_1  H x W
 
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात गुरुवारी ७५३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक अधिक ११५ रुग्ण हे जळगाव शहरातील आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २९ हजार पार करुन ३० हजाराकडे वाटचाल करीत आहे. दिवसभरात ५१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचारादरम्यान ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
जळगाव शहर ११५, जळगाव ग्रामीण १९, भुसावळ ५०, पाचोरा ३६, अमळनेर ८७, भडगाव ४२, चोपडा ७४, धरणगाव २७, यावल ३८, एरंडोल ९, जामनेर ३८, रावेर १३, पारोळा ९६, चाळीसगाव ५८, मुक्ताईनगर २७, बोदवड १८ व इतर जिल्ह्यातील ५ रूग्णांचा समावेश आहे.
 
तीस हजाराकडे वाटचाल
जिल्ह्यात कोरोनाचे ७५३ नवे रुग्ण आढळून आले आहे. आतापर्यंतजल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा २९ हजार ६८६ इतका आहे. त्यापैकी आजवर २१ हजार ३४३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दिवसभरात ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये जळगावातील ३, एरंडोलमधील २, भडगावमधील २, अमळनेर व जामनेर मधील प्रत्येकी एका रग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात मृतांची संख्या ८४० इतकी आहे. सध्या जिल्हाभरात ७ हजार ५०३ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण यांनी दिली.