जिल्ह्यात आढळले ८०१ रुग्ण

    दिनांक : 02-Sep-2020
Total Views |
जळगाव शहरात १९३ रुग्ण, ५६२ कोरोनामुक्त
 
 
corona_1  H x W
 
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात बुधवारी ८०१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक अधिक १९३ रुग्ण हे जळगाव शहरातील आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २८ हजारावर पोहचला आहे. दिवसभरात ५६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचारादरम्यान ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर १९३, जळगाव ग्रामीण ३८, भुसावळ ६९, पाचोरा ८, अमळनेर ५१, भडगाव ६, चोपडा ८२, धरणगाव २१, यावल २०, एरंडोल १२८, जामनेर ६२, रावेर २०, पारोळा १७, चाळीसगाव ५४, मुक्ताईनगर २, बोदवड २२ व इतर जिल्ह्यातील ८ रूग्णांचा समावेश आहे.
 
दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा २८ हजार ९३३ इतका आहे. त्यापैकी आजवर २० हजार ८३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दिवसभरात ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात एरंडोल शहरात व भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी दोन, अमळनेर, जामनेर, भडगाव, रावेर तालुक्यातील प्रत्येकी एका रग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात मृतांची संख्या ८३१ इतकी आहे. सध्या जिल्हाभरात ७ हजार २७२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण यांनी दिली.