वाशी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदीचाळीसगावचे सुपुत्र डॉ.कपील पाटील यांना पदोन्नती

    दिनांक : 16-Sep-2020
Total Views |

shirpur _1  H x
शासनाकडून पदोन्नती देऊन कोरोेना
योध्दाचा गौरव, कोविड रुग्ण सेवेचे फलित
चाळीसगाव : शिरपुर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तथा चाळीसगावचे सुपुत्र डॉ.कपील पाटील यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.
 
शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या कामाचे योगदान आणि कोरोना काळात रुग्णांचे केलेले समुपदेश यांची शासनाने दखल घेऊन त्यांना वाशी येथे वैद्यकीय अधिक्षक म्हणून पदोन्नती दिली आहे. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांवर त्यांनी उपचारच केले नाहीत तर कोरोना रुग्णांचे समुपदेशन करून त्यांच्यातील भिती दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. उपरार्थ रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांशी मनमोकळा संवाद साधून त्यांच्यातील भिती ते पुर्णपणे नाहीशी करीत होते.
 
परिणामी तालुक्यातील बरे झालेले कोरोना रुग्ण त्यांना देवदूताप्रमाणे मानतात. कारण कोरोना काळात रुग्णांना उपचाराबरोबर मनोबल वाढविण्याची गरज होती. त्यावर त्यांनी प्रकर्षांने काम केले. त्यामुळे त्यांच्या कार्य पध्दतीचा वेगळा ठसा जनमानसात उमटला. खानदेशातील शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोविडमध्ये केलेल्या कामामुळे डॉ.कपील पाटील यांचा खर्‍या अर्थाने शासनाकडून कोरोना योध्दा म्हणून गौरव झाला आहे. जळगाव, धुळे, नंदुबार तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.