आता सर्दी, खोकला, तापावर नाही मिळणार औषधी

    दिनांक : 07-Aug-2020
Total Views |
डॉक्टरांची चिठ्ठी बंधनकारण : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

sdf_1  H x W: 0
 
जळगाव, ७ ऑगस्ट
जिल्ह्यात कोरोना संसर्गात सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात, अशा लक्षणाच्या आजारावरील औषधांची मागणी रुग्णाव्दारे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करुन नये, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवारी काढले आहे.
 
सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच जिल्ह्यात बरेचसे रुग्ण हे कोरोना संसर्गाच्या अंतिम टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गात सर्दी, खोकला, ताप, आदी लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात. अशा लक्षणाच्या आजारावरील औषधांची मागणी रुग्णाव्दारे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करुन नये. अशा लक्षणाच्या आजारावरील औषधांचा पुरवठा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय केल्यास रुग्ण हा मुळ आजाराच्या उपचारापासून वंचित राहु शकतो व त्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.
 
विक्री झाल्यास होणार कारवाई
ही बाब विचारात घेता, सर्दी, खोकला, ताप या सारख्या आजारावरील कोणत्याही प्रकारच्या औषधाची विक्री कुठल्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करण्यात येऊ नये. या सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या बाबींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.