जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १३ हजारांवर

    दिनांक : 06-Aug-2020
Total Views |
३२१ नवीन रुग्णांची भर, २०० रुग्ण कोरोनामुक्त

corona_1  H x W 
 
जळगाव : जिल्ह्यात दिवसभरात तब्बल ३२१ नवीन रूग्ण आढळून आले असून त्यात जळगावसह एरंडोल तालुक्यातील रूग्ण सर्वाधिक आहेत. तर गुरुवारच्या रुग्णसंख्येवरुन जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १३ हजारांच्या पार गेला आहे. तर २० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
 
 
जिल्ह्यात गुरुवारी ३२१ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून सर्वाधिक ७९ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल एरंडोल तालुक्यात ५१ रूग्ण आढळून आले आहेत.
 
 
असे आहेत नवीन कोरोनाबाधित रुग्ण
जळगाव ग्रामीण १२, भुसावळ १९, अमळनेर १५, चोपडा २०, पाचोरा १८, धरणगाव १८, यावल ९, जामनेर १५, रावेर ६, पारोळा ३, चाळीसगाव १८, मुक्ताईनगर ३६, बोदवड १ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील २ असे रूग्ण आढळून आले आहेत.
 
 
सध्या ३ हजार ३५७ रुग्णांवर उपचार
दरम्यान, आजवरच्या कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ८७ इतकी झाली आहे. त्यातील ९ हजार १४५ रूग्ण बरे झाले आहेत. त्यात गुरुवारी २०० रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर दिवसभरात ८ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ५८४ इतका झालेला आहे. सध्या ३ हजार ३५८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.