ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचा अभिमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    दिनांक : 05-Aug-2020
Total Views |
अयोध्या : गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झालीय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. यासाठी, दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्त निश्चित करण्यात आला होता.
 
 
PM_Modi_Speech_1 &nb
 
 
भूमिपूजन करणाऱ्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १९८९ पासून जगभरातून भक्तांनी राम मंदिरासाठी विटा पाठवल्या आहेत. तब्बल २ लाख ७५ हजार विटांतील १०० विटांवर 'जय श्रीराम' असं कोरलेलं आहे. मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल हेदेखील पूजेसाठी उपस्थित होते. यातील नऊ विटा पूजेत सामील करण्यात आल्या. दरम्यान, राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करत आहेत.
 
  • जगातले अनेक लोक स्वत:ला रामाशी निगडीत मानतात. कंबोडिया, थायलंड, मलेशिया, इराणमध्येही राम कथा आढळतील. नेपाळ आणि श्रीलंकेचा तर रामांचा आत्मीय संबंध आहे - मोदी
  • तुलसीदास यांचे राम सगुण राम आहे. नानक आणि कबीर यांचे राम निर्गुण राम आहेत. स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींचे रघुपती राम आहेत. राम वेगवेगळ्या रुपांत आढळतील. भारतात ते अनेकतेत एकतेचं सूत्रं आहेत. तामिळ, मल्याळम, बांग्ला, काश्मीर, पंजाबीमध्ये राम आहेत - मोदी
  •  श्रीराम भारताच्या आत्म्यात वसलेत : पंतप्रधान मोदी
  • इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. श्रीरामांना खारीसहीत वानर, केवटच्या वनवासी बंधुंची सोबत मिळाली होती. ज्या पद्धतीनं दलित, मागासवर्गीय, आदिवासी अशा प्रत्येक वर्गानं स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींना साथ दिली होती.... त्याच पदधतीनं सर्वांच्या सहकार्यानं राम मंदिराचं निर्माण होतंय - मोदी
  •  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशवासियांनी शांतीसहीत सर्वांच्या भावाना लक्षात घेत व्यवहार केला. आजही तीच मर्यादा पाहायला मिळतेय - मोदी