आगामी निवडणूकीसाठी कामाला लागा

    दिनांक : 31-Aug-2020
Total Views |
 
amalner _1  H x
 
भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे यांचे
अमळनेर भेटीत कार्यकर्त्यांना आवाहन
तभा वृत्तसेवा
अमळनेर, ३१ ऑगस्ट
स्व. उदय वाघ यांनी अमळनेर मतदार संघाला पक्षाचा बालेकिल्ला बनवला आहे. त्यांच्यात मोठे संघटन कौशल्य होते. पक्ष वाढला तर आपण वाढू म्हणून आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, मार्केट कमिटी, शेतकी संघ या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी रुसवे फुगवे बाजूला सारून केवळ पक्षासाठी कामाला लागा, असे आदेश जिल्हाध्यक्ष तथा आ. सुरेश भोळे यांनी सोमवारी अमळनेर येथे दिले. माजी आ. स्मिताताई यांनी ही मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली.
 
आ. सुरेश भोळे यांची भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते जिल्हाभर कार्यकर्ता व पदाधिकारी यांची भेट आणि बैठका घेऊन परिचय करून घेत आहेत. सोमवारी ते अमळनेर येथे आले असता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थापन केलेल्या गणरायाची त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी माजी आ. स्मिताताई वाघ, ऍड. ललिताताई पाटील, सभापती प्रफुल्ल पवार, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, जि.प.सदस्य संगीताताई पाटील, उपसभापती भिकेश पाटील, ऍड. व्हि.आर.पाटील, माजी सभापती श्याम बापू अहिरे, सरचिटणीस राकेश पाटील,बबलू राजपूत, राहुल पाटील,कु.उ.बा.संचालक पराग पाटील, राहुल पाटील, प्रकाश पाटील,सिनेट सदस्य दिनेश नाईक, माजी अध्यक्ष शितल देशमुख, दीपक पाटील, देवा लांडगे,सचिन पान पाटील ,युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी राजपूत, योगीराज चव्हाण, पंकज भोई, राहुल चौधरी, समाधान पाटील, अयाज बागवान, निखिल पाटील, भूषण पाटील, महेश पाटील ,राहुल कंजर आदी उपस्थित होते.
आ. भोळे यांच्या हस्ते दिवंगत जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे व नाटेश्वर पाटील जानवे यांच्या स्मरणार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अमळनेर येते कोरोना काळात अहोरात्र सेवा देणारे ग्रामीण रुग्णालय डॉ. प्रकाश ताडे, डॉ. जितेंद्र पाटील, सुवार्ता वळवी, प्रियांका लधानी,राम मंदिर आंदोलन वेळी आयोध्याला गेलेले कारसेवक झुलाल पाटील, दिनेश नाईक, गोकुळ परदेशी, सखाराम जाधव यांचा सत्कार केला. तसेच अमळनेर मधील मुस्लिम युवक कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करणार्‍या आवास फाउंडेशनच्या टीमचा देखील सत्कार केला.आभार चंद्रकांत कंखरे यांनी केले.