शहरात आढळले १६९ कोरोनाबाधित

    दिनांक : 30-Aug-2020
Total Views |
रुग्णसंख्या झाली सहा हजारांवर, दिवसभरात ४३ कोरोनामुक्त
 
 
corona_1  H x W
 
जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून रविवारी तब्बल १६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून असून नवीन भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दिवसभरात शहरातील दोन वयोवृद्धांचा मृत्यू झाला असून ४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरातील विविध कोविड केंद्रावर १६६१ रुग्णांवर उपचार सुुर आहे.
 
शहरातील अँटिजेन टेस्टचे प्रमाण वाढविण्यात आले असून विविध ठिकाणी कोरोनाची तपासणी प्रशासनातर्फे केली जात आहे. तसेच अनेक कोरोनाची तपासणीसाठी अनेकजण स्वतःहून येत असल्यामुळे दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शहरातील रुग्णसंख्या ६ हजार १२४ इतकी झाली असून त्यापैकी ४ हजार २८५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तसेच शहरात कोरोनाने एकूण १५६ जणांचा बळी घेतला आहे.
 
शहरात अनेक ठिकाणी शिरकाव
शहरात रविवारी अँटिजेन टेस्टद्वारे पिंप्राळ्यात ७, वाघनगर ४, निवृत्तीनगर ६, भोईटेनगर २, शंकररावनगर १, खोटेनगर ७, संभाजीनगर १, मोहननगर १, रामेश्‍वर कॉलनी ९, विठ्ठलपेठ ५, अयोध्यानगर १, कांचननगर २, प्रेमनगर १, आशाबाबा नगर३, तुकाराम वाडी १, वाघनगर २, रामानंदनगर ५, श्रीकृष्णनगर २, हायवे दर्शन कॉलनी २, मुक्ताईनगर ४, गजानननगर ५, दादावाडी १, दक्षतानगर २, पोलीस लाईन १, महाडा कॉलनी १, जानकीनगर १ असे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल आहे.
 
जिल्ह्यात आढळले ६९६ रुग्ण
जिल्ह्यात रविवारी ६९६ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारावर गेला आहे. तसेच दिवसभरात जिल्ह्यात ८ रुग्णांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील दोन, भुसावळ, पाचोरा, भडगाव, चोपडा, चाळीसगाव व एरंडोल तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात दिवसभरात ५१५ रुग्णांनी कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे.
 
जिल्ह्यात नवीन आढळलेले रुग्ण
नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जळगाव शहरात १६९, जळगाव ग्रामीण ५९, भुसावळ २६, अमळनेर १४२, चोपडा ७८, पाचोरा १२, भडगाव १२, धरणगाव २३, यावल ११, एरंडोल ५, जामनेर ३४, रावेर २७, पारोळा ५९, चाळीसगाव २७, मुक्ताईनगर ८, बोदवड ३, इतर जिल्ह्यातील १ असे एकूण ६९६ नवीन रुग्ण आहेत.
जिल्ह्याचा मृत्यूदर २.९७ टक्के
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ हजार १३५ इतकी असून त्यापैकी १९ हजार २१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर कोरोनामुळे ८०६ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्याचा मृत्यूतर २.९७ टक्के इतका आहे. सध्या जिल्ह्यात ७ हजार ११६ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.