रशियात ऑक्टोबरमध्ये मिळणार कोरोना लसीची पहिली मात्रा

    दिनांक : 03-Aug-2020
Total Views |
 
मॉस्को : रशियाने कोरोना विषाणूविरोधात विकसित केलेली लस पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरली होती. रशियाने येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावेळी प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीची पहिली मात्रा देण्यात येईल, अशी माहिती रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली.
 
 

Corona-Vaccine_1 &nb 
 
गेमली इन्स्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या नैदानिक चाचण्या पूर्ण झाल्या असून, नोंदणीसाठी कागदोपत्री काम सुरू आहे, असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्कोव यांनी सांगितले. लसीच्या सर्व वैद्यकीय नैदानिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत, असे ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. नोंदणी झाल्यानंतर आठवड्याभरात लसीकरण सुरू होईल. नियमानुसार या लसीच्या चाचण्या झाल्या असून, कुठेही संशोधनाचा कालावधी कमी केलेला नाही, असे रशियन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या लसीच्या पसिल्या नैदानिक चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने 18 जून रोजीच सुरू केल्या होत्या.
 
 
 
मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे, हाच या चाचणीमागचा हेतू होता आणि तो साध्य झाला आहे, असे अलेक्झांडर लुकाशेव्ह यांनी पहिल्या टप्प्यानंतर सांगितले होते. कोरोना विरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.