अमळनेरात वरद विनायक हॉस्पिटल कोविड सेंटरचे उद्घाटन

    दिनांक : 03-Aug-2020
Total Views |
 
 
कळमसरे, ता.अमळनेर : अमळनेर शहरातील तज्ञ फिजिशियन डॉ अविनाश जोशी,डॉ निखिल बहुगुणे,डॉ किरण बडगुजर, डॉ. प्रशांत शिंदे आणि डॉ.संदीप जोशी आदींनी एकत्रित येत धुळे रोड येथे असलेल्या सरजू गोकलाणी यांच्या भव्य कलागुरु मंगल कार्यालयात शासनाच्या परवानगी ने भव्य वरद विनायक हॉस्पिटल नावाचे कोविड सेंटर निर्माण केले असून एकाच सुमारे ७५ रुग्णांची सोय असणार्‍या या हॉस्पिटलचे १ ऑगस्ट रोजी माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील आदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी आ. डॉ. बी.एस. पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, न.प.च्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, ज्येष्ठ सर्जन डॉ. अनिल शिंदे, आयएमएचे अध्यक्ष डॉ नितीन पाटील,ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. मयुरी जोशी ,प्रशासन अधिकारी संजय चौधरी, डिगंबर महाले, नगरसेवक निशांत अग्रवाल, श्यामकांत पाटील, पो.को डॉ शरद पाटील यासह हॉस्पिटलचे संचालक डॉ अविनाश जोशी, डॉ.निखिल बहुगुणे, डॉ किरण बडगुजर,डॉ प्रशांत शिंदे व डॉ संदीप जोशी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी संपुर्ण हॉस्पिटलची पाहणी करून उपलब्ध केलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.
 

Kalamsara_Covid_1 &n 
 
 
 
डॉक्टर्ससह ३५ ते ४० जणांचा स्टाफ कार्यरत
या कोविड हॉस्पिटलमध्ये प्रमुख पाच डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली ३५ ते ४० जणांचा स्टाफ कार्यरत असणार आहे,यात आर एम ओ डॉक्टर्स, अनुभवी नर्सेस व वॉर्डबॉय १५, क्लिनिंग स्टाफ, सिक्युरिटी गार्ड, पॅथॉलॉजिस्ट, फार्मासिस्ट आदी कार्यरत असणार आहेत.
 
 
कोविड चाचणीदेखील येथेच होणार
या कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची कोविड तपासणी अँटीजन टेस्ट अथवा स्वॅब घेऊन याच हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार असून त्याचा अहवाल देखील तात्काळ प्राप्त होणार असल्याने तात्काळ रुग्णांवर उपचार सुरू केले जाणार आहेत.
 
 
बालरुग्णांवरही होणार उपचार
कोरोनाग्रस्त बालकांवर देखील या रुग्णालयात उपचार होणार असून अमळनेर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ नितीन पाटील व डॉ शरद बाविस्कर हे बाल रुग्णांवर उपचार करणार आहेत.
 
 
सेवा हाच उद्देश : डॉ अविनाश जोशी
या कोविड हॉस्पिटलचे डॉ.अविनाश जोशी बोलताना म्हणाले की, आजपासून हे रुग्णालय रुग्णांसाठी खुले झाले आहे, याठिकाणी वाजवी दरातच सेवा आम्ही देणार आहोत, विश्वास ठेवा सेवा देण्याच्या उद्देशानेच हे हॉस्पिटल आम्ही सुरू केले असल्याचे डॉ.जोशी यांनी सांगितले.