मंदिरे उघडण्यासाठी शहरात ‘घंटानाद’

    दिनांक : 29-Aug-2020
Total Views |
भाजपा महानगरतर्फे ‘दार उघड उद्धवा दार उघड’च्या घोषणा, ठिकठिकाणी आंदोलने

bjp_1  H x W: 0
 
 
जळगाव: राज्यातील मंदिरे, देवस्थान सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजप आणि अध्यात्मक समन्वय आघाडीतर्फे शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील मंदिरांसमोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मंदिरे सुरु करण्याच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत ठिकठिकाणी हे घंटानाद आंदोलन झाले.
 
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरं गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहेत. मंदिरं दर्शनासाठी खुली करा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांमधील मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली, पण महाराष्ट्र सरकारच अजून मंदिरं खुली करण्यास तयार नाही, असा आरोप यावेळी विविध धार्मिक संस्थानांनी केला.
 
शहरात विविध ठिकाणी आंदोलन
लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिरांचं टाळं काही उघडलं नाही, असा आरोप आ.सुरेश भोळे यांनी यावेळी केला. या आंदोलनात भाजपसह विश्व हिंदू परिषदही सहभागी झाले आहे. शहरात भाजपा महानगरतर्फे प्रत्येक मंडलात, गोलाणी मार्केटसमोरील हनुमान मंदिर, अयोध्या नगर तसेच बजरंग दलातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
 

VHP_1  H x W: 0 
 
विश्व हिंदू परिषदतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
विश्व हिंदू परिषदतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यातील बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर जिल्हा मंत्री देवेेंद्र भावसार, महानगर उपाध्यक्ष हरिष कोल्हे, जिल्हा संयोजक राकेश लोहार, महामंत्री दीपक दाभाडे, महानगर संयोजक समाधान पाटील, प्रखंड संयोजक पवन शिंपी, प्रसिद्धीप्रमुख महेश अंबिकर, राहुल जोशी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 
‘घंटानाद’ने गोलाणी परिसर दुमदुमला
भाजपा जिल्हा महानगरतर्फे मंदिर उघडण्यासाठी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशा घोषणा देत सकाळी ११ वा. गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदिराजवळ आंदोलन झाले. घंटानाद आंदोलनामुळे संपूर्ण गोलाणी मार्केट परिसर दुमदुमला. यावेळी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा आ. सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आ.गुरुमुख जगवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. जनतेच्या भावनांचा आदर करुन लवकरात लवकर बंद मंदिरे उघडण्यात यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, जिल्हा पदाधिक महेश जोशी नितीन इंगळे, गटनेते भगत बालाणी, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा पदाधिकारी सुनिल माळी, प्रदीप रोटे, राजु मराठे, सुशील हासवणी, महेश चौधरी, भगतसिंग निकम, मनोज आहुजा, युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद सपकाळे, किसन मराठे, प्रकाश पंडित, संजय लुल्ला, उमाकांत वाणी, लता बाविस्कर, प्रवीण जाधव, प्रदीप शेटे, अनिल जोशी, गणेश वाणी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
 

shindi_1  H x W 
 
सिंधी कॉलनीत आध्यात्मिक समन्वय समितीतर्फे घंटानाद
अनेकवेळा मागणी करून देखील महाराष्ट्र सरकार देवस्थाने उघडण्यास परवानगी देत नसल्याने शनिवारी आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे सिंधी ग्लोबल ट्रस्टचे राष्ट्रीय प्रमुख माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांच्या नेतृत्वाखाली सिंधी सेवा मंडलजवळ घंटानाद आंदोलन झाले. आध्यात्मिक समन्वय समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठकीनुसार शनिवारी सकाळी ११ वाजता सिंधी सेवा मंडल येथे माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, आ.सुरेश भोळे, गटनेते भगत बालाणी, सुशील हासवाणी, अशोक मंधान आदी उपस्थित होते.
 
 
भाजपा मंडल ३ तर्फे अयोध्यानगरात ‘घंटानाद’
अयोध्यानगर येथील हनुमान मंदिरात भाजपा मंडल क्र.३ आणि हिदूत्ववादी संघटणेतर्फे मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मंडलाध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण कोल्हे, महानगर जिल्हा उपाध्यक्ष, माजी नगरसेवक प्रदिप रोटे, मातोश्री कंट्रक्शनचे संचालक विजय वानखेडे, प्रभाग समीती सदस्य संतोष इंगळे, युवामोर्चा अध्यक्ष गौरव येवले, महानगर जिल्हा सरचिटणीस अक्षय जेजुरकर, जितेंद्र चौथे, मंडल चिटणीस योगेश निबांळकर, मंडल सरचिटणीस, किसन मराठे, धनराज पाटील, गोकुळ पाटील, राहुल पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. देवाच्या दर्शनाच्या आड येऊ नका अन्यथा राज्य सरकारला भोग भोगावे लागतील, अशी टीका प्रदिप रोटे यांनी यावेळी केली.