जिल्ह्यात दिवसभरात ६१० रुग्ण कोरोनामुक्त

    दिनांक : 29-Aug-2020
Total Views |
५६६ नवीन रुग्णांची भर, ९ जणांचा मृत्यू

corona_1  H x W 
 
जळगाव : जिल्ह्यात शनिवारी ६१० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. तर ५६६ नवे कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा २६ हजारावर गेला आहे. तसेच दिवसभरात जिल्ह्यात ९ रुग्णांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे.
 
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णसंख्येहून अधिक रुग्ण बरे झाले आहे.
 
नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जळगाव शहरात १४३, जळगाव ग्रामीण ४६, भुसावळ ३०, अमळनेर ७४, चोपडा ५१, पाचोरा १०, भडगाव ३६, धरणगाव २४, यावल २३, एरंडोल ७, जामनेर ४१, रावेर १६, पारोळा २७, चाळीसगाव १८, मुक्ताईनगर १०, बोदवड ५, इतर जिल्ह्यातील ५ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पाचोरा, चोपडा, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर भुसावळ, भडगाव, रावेर तालुक्यातील प्रत्येकी १ याप्रमाणे रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६ हजार ४३९ इतकी असून त्यापैकी १८ हजार ६९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर कोरोनामुळे ७९८ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या जिल्ह्यात ६ हजार ९४३ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.