गणेश मूर्ती संकलन केंद्रास प्रतिसाद

    दिनांक : 26-Aug-2020
Total Views |
शहरातून १५० अधिक मूर्ती अर्पण, मनपाच्या रथाद्वारे मेहरुण तलावात विसर्जन
 
 
ganesh_1  H x W
 
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून थेट श्रीगणेश मूर्ती विसर्जन न करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत पाचव्या दिवशी नागरिकांकडून मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रात १५० हूनअधिक मूर्ती अर्पण करण्यात आल्या. या मूर्ती अर्पण रथाद्वारे मेहरुण तलावात सायंकाळी विसर्जन करण्यात आल्या.
 
यंदा राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. तसेच गणेश मूर्तींचे संकलन करा, अशा सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवातील पहिला विसर्जन सोहळा बुधवारी पार पडला. त्यात गणेशभक्तांचा प्रतिसाद मिळाला.
 
आयुक्तांकडून केंद्रास भेट
मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी मूर्ती संकलन केंद्रास भेट दिली. तसेच मूर्तीची कुठल्याही प्रकारची विटंबना होणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. तसेच चारही प्रभाग अधिकार्‍यांकडून संबंधित मूर्ती संकलित केंद्राची पाहणी केली. यावेळी कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस पथक होते.
 
२६ संकलन केंद्राद्वारे मूर्ती स्वीकारल्या
गणेश मूर्ती विजर्सनासाठी मनपाद्वारे शहरात २६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्राद्वारे मूर्ती विसर्जनासाठी मूर्ती अर्पण रथ तयार करण्यात आला होता. त्या रथाद्वारे मेहरुण तलावात सायंकाळी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तसेच मेहरुण तलाव परिसरात मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना परवानगी नसल्याने येथे वाहतूक पोलिसांकडून बॅरिकेस्ट लावण्यात आले होते. येथे येणार्‍या नागरिकांकडून मनपाद्वारे मूर्ती स्वीकारण्यात येत होती.