भरदिवसा अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू

    दिनांक : 25-Aug-2020
Total Views |

pachora _1  H x 
प्रांताधिकार्‍यांनी इशारा करताच ट्रॅक्टरचालक फरार,
अज्ञात चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
पाचोरा : प्रांताधिकारी राजेंद्र कचरे हे २५रोजी सकाळी १०:४५ वाजता शासकीय वाहन क्रमांक एम एच -१९/एम-५११ ने बॉंबरुड येथील कोविड सेंटर येथे भेट देण्यासाठी जात असताना पुनगाव हद्दीत भाग्यलक्ष्मी हॉटेल समोर एका बाजूने बेकायदेशीर वाळू वाहतूक करतांना ट्रॅक्टर आढळून आले. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी ट्रॅक्टर चालकास हाताने इशारा करून थांबविण्यासाठी प्रयत्न केला परंतु तो न थांबता शासकीय वाहन दिसताच ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर चालू स्थितीत सोडून पळ काढला. परंतु ट्रॅक्टर चालू स्थितीत असल्यामुळे पुढे १०० मीटर अंतरावर एक घर व लहान मुले खेळत होते. मोठा कुठल्याही प्रकारे अनर्थ होऊ नये म्हणून प्रांताधिकारी यांचे चालक अजीजबेग मिर्झा यांनी शासकीय वाहन थांबवून स्वतः ट्रॅक्टरला ब्रेक दाबून थांबविले. पुढील अनर्थ टळला. या घटनेबाबत स्वतःप्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला पत्र देऊन फिर्याद दाखल केल्याने ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर पाचोरा तहसील आवारात जप्त करण्यात आले आहे. सदरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय मालचे करीत आहेत.