कासोदा येथे घरफोडी

    दिनांक : 25-Aug-2020
Total Views |

kasoad_1  H x W
घर बंद असल्याने चोरट्यांनी साधली
संधी, ८ लाखाचा ऐवज लंपास
कासोदा : पत्नी आजारी असल्याने पत्नीच्या उपचारासाठी गेल्या आठ दिवसांपासून जळगाव येथे असल्याने कासोदा येथील बंद असलेल्या घरावर चोरट्यांनी ८ लाखांचा ऐवज लंपास करत पसार झाले.
जिल्हा बँक परिसरातील मुकुंदा अंबादास कुलकर्णी वय ६५ वर्ष हे पत्नी आजारी असल्याने पत्नीच्या उपचारासाठी १८ ऑगस्टपासून जळगाव येथील रुबी हॉस्पिटला दाखल केल्यामुळे कुलकर्णी हे गेल्या आठ दिवसांपासून जळगाव येथे आहेत. कासोदा येथील घर बंद असल्याने चोरट्यांनी २४ व २५ ऑगस्टच्या मध्यरात्री त्याचा फायदा उचलत घराच्या मागील बाजूचा दरवाजाचे कुलुप तोडत घरातील वरील मजल्यावर असलेल्या कपाट उघडून आत असलेला त्यांनी विकलेला जळगाव येथील औद्योगिक वसाहतीत असलेला प्लाट ५ लाखांत तर २ लाखांचा मका विकला होता. त्यातून मिळालेले दोन लाख रुपये असे सात लाख रोख व एक लाख रुपयांचे दागीने असा ८ लाख ५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास करत पसार झाले. सकाळी ८ वाजता घराचा मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसल्याने घराजवळील नागरिकांनी चौकशी केली असता तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले.
चाळीसगावचे अप्पर पोलिस अधीक्षक
सचिन गोरे यांची घटनास्थळी भेट
चाळीसगावचे अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांना चोरीची माहिती मिळताच त्यांनी २५ रोजी कासोदा येथे येवून घटनास्थळी पाहणी करत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर चाळीसगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावंडे ,जळगाव येथून फिंगर एक्सपर्ट व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्वानाने दिडशे ते दोनशे फूटापर्यंत मार्ग दाखवला परंतु चोरट्यांनी एखादी वाहनाचा वापर केला असावा त्यामुळे पूढे मार्ग दाखवू शकले नाही. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नरेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पो. कॉं. जितेश पाटील, इम्रान खान, दिपक आहिरे हे करित आहे.