निंबा देवी धरण ओव्हरफ्लो , शेतकरी सुखावला

    दिनांक : 24-Aug-2020
Total Views |
 
 

dahigaon_1  H x
दहिगाव ता यावल : येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेले सातपुड्याच्या पायथ्याशी निंबा देवी धरण ओव्हर फ्लो झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
निसर्गरम्य असाय अशा या निंबादेवी धरणाची खोली २२ मीटर आहे. या धरणाची क्षमता दोन पॉईंट ५० घनमीटर असून या धरणाची ८०० एकर जमिनीला पाण्याचा फायदा होणार आहे. धरणाचे काम पूर्ण झाले असून पाणीवापर संस्थेमार्फत या पाण्याचे वितरण केले जाईल साडे सात किलोमीटर लांबीची पाइपलाईन शेतकर्‍यांना पाणीपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे सावखेडा सिम शिवारातील सर्व शेतजमिनीला याचा फायदा होणार आहे अशी माहिती अभियंता एन. टी.आढे यांनी दिली. धरणाचा ओव्हरफ्लो काढण्यासाठी आकर्षक अशा पायर्‍या तयार करण्यात आलेल्या आहेत. पायर्‍यावरून पाणी वाहत असल्याने एक प्रकारे याठिकाणी आकर्षक असे सुंदर वातावरण पहायला मिळाले. आजूबाजूचा परिसर हरियालीने माखलेला असल्याने याकडे प्रेक्षकांची व पर्यटन प्रेमींची ओढ निर्माण झालेली आहे येथे मध्यप्रदेशात सहज जळगाव जिल्ह्यातील लांब लांब अंतरावरून पर्यटक येथे येत असतात. या पर्यटन क्षेत्राचा आनंद घेत असतात. मात्र यावर्षी कोरोना महामारी असल्यामुळे येथे गर्दी होऊ नये याची दक्षता मात्र संबंधित प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.