स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जळगाव मनपा ६४ व्या स्थानी

    दिनांक : 20-Aug-2020
Total Views |

mnpa_1  H x W:
 
जळगाव : स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२० चा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात जळगाव शहर महापालिका देशातून ३८२ शहरांमधून ६४ व्या स्थानावर तर राज्यातील ३३ मनपातून २० व्या स्थानावर आहे. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत राज्य आणि कें द्रीय समितीने डिसेंबर १०१९ आणि जानेवारी २०२० मध्ये पाहणी केली होती.मागील वर्षी ७६ व्या स्थानी असलेली जळगाव महापालिक यंदा ६४ व्या स्थानी आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
स्वच्छ भारच अभियांतर्गत केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात देशातील १ लाख ते १० लाख लोकसंख्येतील ३८२ शहरात जळगाव शहराचा देखील समावेश आहे. या अभियानाची जळगाव मनपात अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागील वर्षी जळगाव मनपा ७६ व्या स्थानी होते. त्यानंतर मनपाने स्वच्छतेच्याबाबत ओला-सुका कचरा वर्गीकरणावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे यंदा ६४ क्रमांकावर स्थान मिळविले आहे.
घनकचरा प्रकल्पाअभावी घसरले स्थान
स्वच्छ सर्वेक्षणाबाबत राज्य आणि केंद्रीय समितीने डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० मध्ये पाहणी केली होती. यावेळी समितीने वेगवेगळ्या प्रभागात भेटी देवून पाहणी केली होती. तसेच नागरिकांचा अभिप्राय ,ओला-सुका कचरा वर्गीकरण,प्लास्टीक बंदी, डोअर टू डोअर कचरा संक लन, कागदपत्रांची पूर्तता आणि घनकचरा प्रक्रिया प्रकल्प या निकषांनुसार समितीने तपासणी केली होती. शहरात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे स्थान घसरले आहे. अन्यथा महपालिका आणखी पुढे राहीली असती.
 
नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा : आयुक्त सतीश कुलकर्णी
शहरातील ७० ते ७५ टक्के कचरा हा घंटागाड्याद्वारे संकलित होत आहे. त्याचे प्रमाण वाढविण्याची गरज असून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील गोळा होणारा कचरा घंटागाडीत टाकाळा, असे आवाहन मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले आहे. तसेच सार्वजनिक शौचालयाचा वापर योग्य पद्धतीने करावा. प्रशासन शहर स्वच्छेतेसाठी प्रयत्नशील असून नागरिकांनीसुद्धा आपल्यापरीने शहर कचरामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले आहे. तसेच गणेशमूर्ती विक्रेत्यांची कोरोना तपासणी होत असून संबंधितांनी ती करुन घ्यावी. जेणेकरुन कोरोनाचे निदान झालेल्या आपल्यासह आपल्या परिवारास सुरक्षित ठेवण्यात मदत होईल, असेही ते म्हणाले.