कोरोनाच्या भीतीने कागदी चलनाची धुलाई

    दिनांक : 02-Aug-2020
Total Views |
ओव्हनमध्ये नाण्यांसोबत नोटाही भाजल्या
 
 
सेऊल : दक्षिण कोरियातील नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीपोटी 2.25 ट्रिलियन डॉलर्स मूल्यांचे कागदी चलन, नाणी नष्ट केल्या किंवा त्यांचे नुकसान केले असल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेकडे आता खराब झालेल्या चलनांचा खच पडून असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
 
Money_1  H x W:
 
बँक ऑफ कोरियानुसार, मागील सहा महिन्यांच्या काळात देशातील लोकांनी 2019 च्या तुलनेत तीनपट जास्त जळालेले कागदी चलन बदलले आहे. जानेवारी ते जूनदरम्यान 1.32 अब्ज वॅन (1.1 अब्ज डॉलर्स) मूल्याच्या जळालेले चलन बँकेत परत आले आहेत. यामागे कोरोनाची भीती असल्याचे प्रमुख कारण दिसून आले आहे. विषाणूचा प्रसार होण्याच्या भीतीने लोकांनी चलन आणि नाणी ओव्हनमध्ये ठेवल्या होत्या. यात त्या जळाल्या, तर काहींनी वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यामुळे खराब झाल्या. यंदा पहिल्या सहा महिन्यांत एकूण 2.2 ट्रिलियन डॉलर्सच्या फाटलेल्या आणि जळालेले कागदी चलन, नाणी बँकेकडे जमा केले आहेत. उम नावाच्या व्यक्तीने 30 हजार डॉलर्स इतक्या मूल्याचे चलन वॉशिंग मशिनमध्ये धुतल्याने फाटले. यात मूळ रकमेपैकी 35 टक्के रक्कम नष्ट झाली. ही रक्कम त्यांना मदत म्हणून कुटुंबातील सदस्यांकडून मिळाली होती.
दरम्यान, संसर्ग फैलावल्यानंतर चीननेदेखील बहुतांशी चलन बदलून नवीन चलन वितरित केले होते. मात्र, कोरियन नागरिकांनी भीतीपोटी केलेल्या वर्तवणुकीमुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.