अयोध्या नगरी सजली, चौकाचौकात रोषणाई

    दिनांक : 02-Aug-2020
Total Views |
अयोध्या : राममंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी आता सजू लागली आहे. अयोध्येतील चौकाचौकात रोषणाई करण्यात आली आहे. शहरात सर्वत्र प्रभू श्रीरामांच्या जीवनाशी संबंधित कला तयार करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी चित्रेही काढण्यात आली आहेत.
 
 
 
Ayodhya_Decoration_1 
 
 
अयोध्या नगरीला अशा प्रकारे सजविण्यात येत आहे की, भूमिपूजनाच्या दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला त्याची भव्यता वेगळी दिसणार आहे.
 
 
शहरभर भिंतींवर चित्रांद्वारे रामायण साकारले जात आहे. अयोध्येच्या रस्त्यारस्त्यांवर रामायणातील कथा साकार केल्या जात आहेत. रामायणातील महत्त्वाची पात्रे भिंतींवर साकारली जात आहेत. ऐतिहासिक शरयू घाटावर साफसफाई सुरू आहे. याच घाटावर दीपप्रज्वलन देखील केले जाणार आहे.
 
 
अयोध्येच्या रस्त्यांवर रामायण साकारणारे कलाकार मुस्लिम आहेत. जवळपास 30 ते 35 मुस्लिम कलाकारांचा हा गट अयोध्येत रामायण साकारण्यात व्यस्त आहे.
 
 
भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सव्वा लाख लाडूंचा प्रसाद तयार केला जातो आहे. एका कार्यशाळेत त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. सर्व आचारी रामनामाचा गजर करीत हा प्रसाद तयार करीत आहेत.
 
 
कमलनाथ म्हणणार हनुमान चालिसा
मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी अयोध्येत राममंदिर भूमिपूजनाच्या एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी आपल्या निवासस्थानी हनुमान चालिसाचे आयोजन केले आहे. कमलनाथ हे हनुमानाचे भक्त आहेत. पक्षाच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी या दिवशी आपापल्या घरीच हनुमान चालिसा म्हणावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले. हा कार्यक्रम आताच आयोजित करण्यामागचे कारण काय, असे विचारले असता, याबद्दल कुणीही शंका उपस्थित करू नये. एप्रिल महिन्यात हनुमान जयंतीलाच ते अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणार होते, पण कोरोनाच्या अनुषंगाने तसे करू शकले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.