नंदुरबारला बिल्डर देवेद्र जैन यांच्या कार्यालयावरील सशस्त्र दरोड्यात बारा लाखांची लूट

    दिनांक : 19-Aug-2020
Total Views |
 
 
नंदुरबार : येथील गणपती मंदीर परिसरातील बिल्डर देवेद्र जैन यांच्या कार्यालयावर सशस्त्र दरोडा घालून सोळा लाखांची लूट केली आहे. डी.सी. डेव्हलपर्सच्या कार्यालयात दोन सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून तेथील कर्मचार्‍याला बांधून ठेवत १२ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली.
 
 
NBR_Daroda1_1  
 
 
नंदुरबार शहरात बुधवार १९ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दोन सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत गजबजलेल्या वस्तीत दरोडा पडल्याने व्यापार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. नंदुरबारातील बांधकाम व्यावसायिक देवेंद्र जैन यांचे गणपती मंदीरामागील भागात मुख्य रस्त्यावर डी.सी. डेव्हलपर्स हे कार्यालय आहे. या ठिकाणाहून त्यांचे आर्थिक व्यवहार चालतात. दोन दरोडेखोरांनी तेथील कर्मचार्‍याला बांधून ठेवत कार्यालयातील १० ते १२ लाखांची रक्कम घेऊन तेथून पोबारा केला. बांधलेल्या कर्मचार्‍याने कशीबशी सुटका करून आरडाओरड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
 
 

NBR_Daroda2_1   
 
 
याशिवाय डीएसके कॉम्पलेक्समध्येही दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे समजते. यावेळी तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस अधीक्षक महेद्र पंडित, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर नवले, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने मागील बाजुच्या रस्त्यापर्यंत माग दाखवला. पोलिसांनी कार्यालयातील तसेच परिसरातील दुकानांबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. याशिवाय डीएसके कॉम्पलेक्समध्येही असा प्रयत्न झाल्याचे समजते.