सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार

    दिनांक : 19-Aug-2020
Total Views |

shushant_1  H x
 
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
 
नवी दिल्ली,
 
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. याच प्रकरणाची कारवाई पाटण्याऐवजी मुंबईतून केली जावी, अशी मागणी करणारी याचिका रियाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
 
बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच या प्रकरणासंबंधित गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना सर्वोच्च न्यालयानाने दिले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही निकालाचे पालन करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला असून महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाला आव्हान देऊ शकते.