एकाच दिवशी ३३० रुग्णांची कोरोनामुक्त

    दिनांक : 17-Aug-2020
Total Views |
जिल्ह्यात २८७ रुग्णांची भर, ९ जणांचा मृत्यू
 
corona_1  H x W
 
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी २८७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात तब्बल ३३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ९ जणांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ६४ रूग्ण हे जळगावातील असून चोपडा तालुक्यात ५० नवीन रूग्णांचा समावेश आहे. तसेच जळगाव ग्रामीण १५, भुसावळ ४, अमळनेर १९, पाचोरा ४, भडगाव १३, धरणगाव ११, यावल १५, एरंडोल ७, जामनेर १२, रावेर ४, पारोळा २१, चाळीसगाव २४, मुक्ताईनगर १७, बोदवड ६ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १ असे नवीन रूग्ण आढळून आले आहेत.
 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १८ हजारावर
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार ५८४ इतकी झालेली आहे. त्यातील १२ हजार ७७४ रूग्ण बरे झाले आहेत. तसेच दिवसभरात ३३० रूग्ण कोरोनामुक्त झाले असून ९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहे. जिल्ह्यात मृतांचा आकडा ६७१ इतका झालेला आहे. सध्या ५ हजार १३९ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सी.एन.चव्हाण यांनी दिली.