चार महिन्यात कोरोनासोबत सध्याचे तिघाडी सरकार देखील जाईल

    दिनांक : 13-Aug-2020
Total Views |

bhadgoan_1  H x
भडगाव येथील बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष
आ. सुरेश भोळे यांचा घणाघात
तभा वृत्तसेवा
भडगाव, १३ ऑगस्ट
तळागाळातील अंत्योदय नागरिकांचा उद्धार व्हावा यासाठी पंडित दीनदयाळ यांनी भाजपची स्थापना केली त्यांच्या विचाराने पक्षाची वाटचाल सुरू आहे. हा विचार अधिक जोमाने पोहचविण्यासाठी येत्या काळात काम करावे लागेल. केंद्राच्या योजनेच्या लाभासाठी मेहनत घ्या. असे काम करा की आपणांस बघून समोरच्या व्यक्तीस आनंद झाला पाहिजे की हाच तो कार्यकर्ता आहे जो आमच्या सुखदुःखात सामील होतो एवढेच नव्हे तर शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्हाला मदत करतो. अशी भावना निर्माण होईल असे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे. आम्ही आणि पक्ष आपल्या सोबत आहोत आपण निर्धास्त रहा. येत्या चार महिन्यात कोरोना आणि सध्याचे तिघाडी सरकार देखील जाईल असा विश्वास नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी व्यक्त केला.
 
खा.उन्मेश पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले केंद्र सरकारने अनेक योजना घोषित केलेल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एकाच वेळी शेतकरी बांधवांनी किसान सन्मान निधीतून १७ हजार कोटी रुपयांची मदत दिली आणि प्रत्येक शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली यासाठी कोणालाही चिरीमिरी देण्याची गरज पडली नाही. त्यांचा प्रचार आणि प्रसार करून समाज सक्षम करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सदैव कार्यरत रहावे. आगामी काळात गावागावात केंद्राच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गटनिहाय शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी के.बी.दादा साळुंखे, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, मा. जि.प. सदस्य श्रावणतात्या लिंडायत, महिला आघाडी अध्यक्षा नूतन पाटील, डॉ संजय महाले, नितीन महाजन उपस्थित होते.
 
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज जाधव, वार्ड बॉय प्रमोद सतुके, सामाजिक कार्यकर्तें शरद हिरे या कोरोना योध्यांचा तसेच अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमीवर कारसेवा करण्यासाठी भडगाव येथील गेलेले कारसेवक प्रभाकर शिंपी, वसंत तांबटकर, बालु शिंदे, हिंमत बडगुजर, राजेश पाटील, दिलीप पाटिल, प्रकाश पाटील, अरुण पाटील, नगराज पाटिल, अनिल शिंदे, गुलाब शिंदे, महेंद्र पाटिल तसेच विहिंप चे विजयराव देशपांडे, विवेक जकातदार यांचा शाल व श्रीफळ देऊन जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, खा. उन्मेष पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच बैठकीच्या सुरूवातीला ग्रामीण रुग्णालय भडगाव येथे स्व. हरिभाऊ जावळे यांचे स्मृतीप्रित्यर्थ ५ वृक्षांची लागवड करण्यात आले. तसेच स्व. हरिभाऊ जावळे, स्व. उत्तमआबा चौधरी, स्व. सचिन दिनानाथ पाटील, स्व. भाऊराव शार्दूल, स्व. मुक्ताबाई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी तालुका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.
 
यावेळी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले. जिल्हा पदाधिकारी के.बी.साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन तालुका सरचिटणीस अनिल मुरलीधर पाटील यांनी केले. आभार शैलेश पाटील यांनी मानले. बैठक यशस्वितेसाठी बन्सीलाल परदेशी, किरण शिंपी, प्रमोद पाटील, प्रदिप कोळी, शेखर बच्छाव, विठ्ठल पाटील, शुभम सुराणा, रविंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.