भारत-नेपाळमध्ये बैठक 17 ऑगस्ट रोजी

    दिनांक : 12-Aug-2020
Total Views |
 
नवी दिल्ली : सीमावादाच्या पृष्ठभूमीवर भारत व नेपाळदरम्यान परराष्ट्र मंत्रालय पातळीवर 17 ऑगस्ट रोजी चर्चा होणार आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांची ही बैठक नेपाळची राजधानी काठमांडू येथे होणार आहे. नेपाळच्या परराष्ट्र सचिव शंकरदास बैरागी आणि नेपाळमधील भारताचे राजदूत विनय क्वाटरा यांच्यात ही बैठक होईल.
 
 
India-Nepal_1  
 
 
दोन्ही देशांमधील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय पातळीवरील ही बैठक नियमित अंतराने आर्थिक व विकासाशी संबंधित मुद्यांवरील द्विपक्षीय बैठक असल्याचे बोलले जाते. 2016 पासून या बैठका होत आल्या आहेत. तर दोन्ही देश चर्चेसाठी तारीख निश्चित करण्यासाठी बोलत होते, असे वृत्त नेपाळमधील प्रसारमाध्यमांनी दिले.
 
 
 
भारत सरकारच्या सूत्रांनीही या बैठकीबाबत दुजोरा दिला आहे. या बैठकीत नियमित अंतराने होणार्‍या या बैठकीत विकास योजनांवर चर्चा होईल तसेच सीमा वादाचा मुद्दाही उपस्थित करण्याची शक्यता आहे.
 
 
 
नेपाळच्या संसदेने जूनमध्ये नवीन नकाशाला मंजुरी दिली होती. यात कालापानी, िंलपियाधुरा व लिपुलेख या भारतातील तीन भागांवर दावा करण्यात आला आहे. नेपाळच्या भारतीय भू-भागावरील केलेल्या दाव्याला कोणतेही ऐतिहासिक तथ्य िंकवा पुरावा नाही. सीमावादावरील नेपाळचा हा निर्णय दोन्ही देशातील परस्पर सामंजस्याचे उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली होती. चर्चेचे सर्व मार्ग आम्ही खुले ठेवले आहेत. मात्र, भारताकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रदीप ज्ञावली म्हणाले होते.