जिल्ह्यात एकाच दिवशी ५२० नवे कोरोनाबाधित

    दिनांक : 10-Aug-2020
Total Views |
जळगावात शहरात १५४ रुग्णांची वाढ, ४३२ जण कोरोनामुक्त
 

corona_1  H x W 
 
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी तब्बल ५२० नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात जळगाव शहरातील १५४ रूग्णांचा समावेश आहे. तर दुसरीकडे दिवसभरात ४३२ रुग्ण बरे होवून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एकाच दिवसात पहिल्यांदाच पाचशेच्या पार रूग्ण आढळून आले असून यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंतेत वाढ झाली आहे.
 
जिल्ह्यामध्ये आढळलेल्या ५२० नवीन बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक १५४ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. त्या खालोखाल जामनेर ७१, चाळीसगाव ५५ रूग्ण आढळले आहे. तसेच जळगाव ग्रामीण ३९, भुसावळ १७, अमळनेर ३४, चोपडा १३, पाचोरा ११, भडगाव १६, धरणगाव ६, यावल १३, एरंडोल ४०, रावेर ७, पारोळा ११, मुक्ताईनगर २५, बोदवड ३ आणि इतर जिल्ह्यातील ५ नवीन रुग्णांचा समावेश आहे.
 
अशी तालुकानिहाय एकूण आकडेवारी
जळगाव शहर ३६९७, जळगाव ग्रामीण ७४५, भुसावळ १०४९, अमळनेर १०८९, चोपडा १०८०, पाचोरा ५९९, भडगाव ६४२, धरणगाव ६६४, यावल ५४०, एरंडोल ७८८, जामनेर १०८६, रावेर ७८५, पारोळा ६०१, चाळीसगाव ७०५, मुक्ताईनगर ४६३, बोदवड २६६, इतर जिल्हे ६४ असे एकूण १४ हजार ८६३ रूग्णांची संख्या झाली आहे.
 
जिल्ह्याचा आकडा १५ हजारांच्या उंबरठ्यावर
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ८६३ इतकी झाली आहे. यातील १० हजार ३०५ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात सोमवारी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ६१३ रूग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार ९४२ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.
 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक
जिल्ह्यात एकाच दिवसात तीनशे व चारशेच्या पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले असले तरी मात्र पहिल्यांदा पाचशेपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी प्रयत्नपूर्वक चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रूग्ण बरे होण्याची वेग वाढल्याची बाब समाधानकारक आहे. जिल्ह्यात दिवभरात ५२० नवीन रूग्ण आढळून आले असले तरी सोमवारीच ४३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.