जामनेरात दुध उत्पादक शेतकर्‍यांच्यामागण्यांसाठी भाजपा महायुतीतर्फे मोर्चा

    दिनांक : 01-Aug-2020
Total Views |

jamner_1  H x W
शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी उद्धव
सरकार अपयशी : आ. गिरीश महाजन
जामनेर :राज्यात मोठ्या तावातावात सात महीन्यापुर्वी स्थानापन्न झालेल्या महाविकास आघाडी सरकार राज्यातील तमाम जनतेसह शेतकरी वर्गाला उद्धव ठाकरे सरकार अपेक्षीत न्याय देऊ शकलेले नाही असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी येथे केला. शनिवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने दुध उत्पादक आणी शेतकर्‍यांच्या दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी तालुका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मोर्चाचे नेतृत्व आ.महाजन यांनी केले. दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी भाजपा महायुतीतर्फे मोर्चा काढण्यात आला.
 
 
आघाडी शासनाने सर्व चांगल्या योजना बंद केल्या.जिल्ह्यासह संपुर्ण तालुक्यातील चांगल्या योजना ज्या शेतकरी-कष्टकरी जनतेच्या हिताच्या होत्या,त्या सर्व थंड बस्त्यात टाकून बंद करून टाकल्या. मका-कापूस खरेदी बंद आहे. शेतकर्‍यांच्या बांधावर बि-बियाणे,खते देण्याची योजना फेल झाली आहे. एकीकडे बोगस बियाणे तर दुसरीकडे पाहीजे, ती खते शेतकर्‍यांना मिळत नाही. दुध उत्पादक शेतकरीही बेजार झाला असून या सर्व समस्यांचे निराकरण झाले नाही तर यापेक्षा राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी दिला.
 
दरम्यान काहीकाळ सोशल डिस्टंगसींगचे पालन करून रास्ता रोकोही करण्यात आला. गिरीश महाजन यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या वतीने तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितू पाटील, जि.प. माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, न.पा. गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, महेंद्र बाविस्कर, बाबुराव हिवराळे, अतिष झाल्टे, नवल पाटील, श्रीराम महाजन, चंद्रशेखर काळे, बाबुराव घोंगडे, राजधर पांढरे, अमर पाटील, गोवींद अग्रवाल, अनीस शेख, रवींद्र झाल्टे, संजय देशमुख, तुकाराम निकम, नाजीम शेख, अरविंद देशमुख, आनंदा लाव्हरे, स्विय सहायक संतोष बारी, दिपक तायडे, नामदेव पालवे आदींसह शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.