लोकमान्य टिळक : एक समग्र विद्यापीठ

    दिनांक : 01-Aug-2020
Total Views |
 
 प्रासंगिक
 
 
ममता पियूष कुलकर्णी 
 
 
लोकमान्य टिळकांचा जीवन काळ २३ जुलै १८५६-१ ऑगस्ट १९२० हा आहे. निर्भिडसिंहगर्जनाकाराची आज शतक पुण्यतिथी. या पुण्यतिथीप्रित्यर्थ टिळकांच्या अतुलनीय व्यक्तिमत्वातील काही पैलू मांडण्याचा हा प्रयत्न. लोकमान्य टिळक समग्रपणे वाचण्याचा माझा प्रयत्न सुरू आहेच. पण आतापर्यंत ऐकलेली टिळकांवरील व्याख्याने आणि वाचलेली पुस्तके यातून टिळकांचे प्राचीन भारतीय संस्कृतीतील योगदान लक्षात घेण्यासारखे आहे.
 
 
 
 
Lokmanya_Tilak_1 &nb
 
लोकमान्य टिळकांचा जीवन काळ हा संपूर्णभारतमातेच्यासुपुत्रांसाठी ब्रिटीश गुलामगिरीचा काळ होता. त्यामुळे अगदी शालेय जीवनापासूनच निर्भीडपणे आपली मते मांडणारे लोकमान्य टिळकांना परकीयांच्या राजनीतीची आणि राजकारणाच्या चालीची प्रचिती येतच होती. लोकमान्य टिळकांचे संस्कृत आणि गणित हे दोन प्रचंड आवडते विषय होते. मात्र त्यांच्या काळात संस्कृत भाषा ही स्वधर्म स्वभाषा असूनसुद्धा फक्त ब्रिटिशराज असल्यामुळे घरातूनच आणि संस्कृत पाठशाळेतूनच संस्कृत भाषेचे ज्ञान मुलांना दिले जायचे. त्या काळातील लहान मुलांना कुटुंबातूनच मंत्र, श्लोक, संस्कृत व्याकरण, त्यातील धातू, उपनयन संस्कार तसेच वेदातील स्तोत्र,सुक्ते यांची बरीच माहिती दिली जायची. त्यामुळे लहानपणापासूनच टिळकांना संस्कृत भाषेचे ज्ञान उत्तम रित्या अवगत होते. एवढेच काय देशी संस्कृत पाठशाळेतून टिळकांच्यानंतरही इ. स.१९५० पर्यंत संस्कृतचे ज्ञान उत्तमरित्या दिले गेले. त्यानंतर मात्र इ.स.१९५० ते १९७२ हा बदलांचा कालखंड ठरला. शाळेतून संस्कृत विषय काढून टाक लागेला. मात्र कालांतराने आधुनिक काळात परत संस्कृत या विषयाचा समावेश शिक्षणात करण्यात आला.असो, सांगण्याचे तात्पर्य की, लोकमान्य टिळक यांच्या काळात ब्रिटिश राज्य असल्यामुळे आणि आधुनिक काळात चुकीची राजनीती अस्तित्वात आल्यामुळे संस्कृत विषय समग्रपणे भारतीयांपर्यंत पूर्णपणे पोहोचू शकला नाही.
 
 
 
लोकमान्य टिळक आणि संस्कृत
लोकमान्य टिळकांनी त्यांच्या विद्यार्थीदशेत असतानाच संस्कृत विषयाच्या आवडीमुळे स्वतः संस्कृतचे श्लोक रचले होते. त्यांचा ‘खलाय:नमः’ हा श्लोक प्रसिद्ध होता. त्यांना श्लोक पूर्ण करण्यासाठी अक्षरे कमी पडल्यास संस्कृतमधील अक्षरे ते व्याकरणदृष्ट्या वापरून लोक पूर्ण करीत असत.विरह विलाप यासाठी टिळकांनी कालीदासांच्या ‘कुमारसंभवा ’तील वृत्ताचा वापर करून कविता लिहिली.
 
 
भारतीय लोकांची पारतंत्र्यामुळे झालेली वाईट अवस्था देखील टिळकांनी संस्कृत श्‍लोकातूनच मांडली. त्या काळात काही शिक्षक इंग्रजांचे स्तुतिपाठक झाले होते. त्यावरही लोकमान्य टिळकांनी संस्कृत श्लोक लिहिला होता. तर काहीवेळा जुन्या श्लोकात बदल करून नवीन शलोकही त्यांनी रचले होते. इ.स.१९०७ मध्ये सुरतला कॉंग्रेसचे अधिवेशन भरले होते. त्याचे अध्यक्ष नामदार गोपाळकृष्ण गोखले होते. या अधिवेशनात कॉंग्रेस पक्ष, जहाल आणि मवाळ या दोन गटात विभागला गेला होता. त्यावेळी नामदार गोखल्यांच्या चुकीच्या भूमिके विषयीही लोकमान्यानीच १८८१ मध्ये सुरू केलेल्या त्यांच्या केसरी वृत्तपत्रातूनच अग्रलेखाद्वारे संस्कृत श्लोकांचा वापर केला होता. त्या श्लोकाचा अर्थ असा होता की,’राजकीय गुरुंनाही योग्य काय आणि अयोग्य काय हे समजत नाही. त्यावर नीट काम करता आले नाही तर त्याचा उपयोग नाही त्यामुळे अध्यक्ष जेव्हा चुकीचे निर्णय घेतात. तेव्हा त्यालाही खडसावून सांगावे लागते’. मला असे वाटते की, टिळकांच्या या श्लोकाची पुनरावृत्ती आजच्या काही राजकीय नेत्यांना तंतोतंत लागू होते असो.
 
 
त्या काळातील शिक्षण या विषयावर टिळकांनी संस्कृत श्लोक रचला. त्यांचे अग्रलेख वाचक काळजीपूर्वक वाचत आणि लक्षात ठेवत असत. विशाखदत्त यांनी लिहिलेल्या ’मुद्राराक्षस’ यावरही लोकमान्य टिळकांनी संस्कृत श्लोक रचले होते. इ.स.१९०५ मध्ये बंगालची फाळणी करणार्‍या लॉर्ड कर्जन विषयीही अग्रलेख लिहिताना ‘लोकांचा नाश करण्यासाठी आलेला धूमकेतू’ याअर्थी एक संस्कृत श्लोक त्यात रचला होता.
 
 
देशी आणि प्रादेशिक भाषांसाठीही संस्कृत भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे असा टिळकांचा आग्रह होता. त्यामुळे लोकमान्य टिळक हे संस्कृत भाषेचे कृतिशील प्रचारक होते यात शंकाच नाही. इ.स.१९०८ ला लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यावेळी देखील संस्कृत भाषेच्या तळमळीने त्यांनी श्री.ओकगुरुजी यांना आपल्या मुलांना संस्कृतचे ज्ञान देण्या विषयक पत्र लिहिले होते. एखाद्या नविन कार्याला सुरुवात करताना लोकमान्य टिळक ’पुनश्च हरिओम’ असे लिहीत असत.याच मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतेवरील भाष्य करणारा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. श्री गजानन महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ग्रंथ पूर्णत्वास न्यायला त्यांना यश मिळाले.यात टिळकांनी गीतेची कर्मपर मांडणी केली आहे. कर्मयोगी होण्यावर तसेच प्राप्त झालेल्या कर्मांचा स्वीकार करण्यावर लोकमान्य टिळकांनी भर दिला आहे. मंडालेच्या तुरुंगात असताना ग्रंथ लिहीत असताना संदर्भ मिळवण्यासाठी त्यांना दोन आठवडे वाट पाहावी लागायची. त्यावेळी संदर्भपुस्तके मिळण्यास उशीर झाल्यास लोकमान्य टिळक पत्रव्यवहारातून पुस्तक कोठे सांडले का? अशी विचारणा करत असत. ज्यावेळी त्यांनी स्वरचित हस्तलिखित ‘गीतारहस्य’ ग्रंथ गहाळ झाला त्यावेळी मी सिंहगडावर जाऊन पुन्हा त्याचे लिखाण करू शकेल इतके माझ्या ते डोक्यात आहे, असे ठणकावून सांगितले. पण सुदैवाने, योगायोगाने ते हस्तलिखित सापडले.
 
 
टिळकांचा वेदांविषयीचा अभ्यास
हिंदू म्हणजे काय? यावरही टिळकांनी संस्कृत श्लोक लिहिला आहे. जी व्यक्ती वेदप्रामाण्य मानते,भक्ती कशी करावी या विषयीचे नियम ज्यांना माहिती आहेत, विविध विधींनी सुसंस्कृत आणि संस्कारशील झाला आहे तो हिंदू होय, असे लोकमान्य टिळकांचे मत होते. लोकमान्य टिळकांनी ऋग्वेदातील ऋचांचा समग्रपणे अभ्यास करून त्याचा संबंध खगोलशास्त्राशी दाखवला आहे. आर्यांचे मूळ उत्पत्तिस्थान कोणते? याविषयी लोकमान्य टिळकांनी ’ढहश जीळेप’ (इ.स.१८९३) आणि ’ढहश Aीलींळलीं केाश खप ढहश तशवरी’ (इ.स.१९०३) या प्रसिद्ध पुस्तकातून वेगवेगळ्या पुराव्यादाखल मांडणी केली आहे.
 
 
या पुस्तकातून आर्य प्रश्न सोडवताना त्यांनी सांख्यकालिकांचा स्पष्टीकरणात्मक अभ्यास केला आहे. ‘द आर्क्टिक होम इन वेदाज’ या पुस्तकात वैदिक साहित्याचा विचार लोकमान्य टिळकांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून मांडला.पाश्चात्य विद्यापीठातील वेगवेगळ्या विद्वानांपर्यंत आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीचे ज्ञान पसरावे ही टिळकांची तळमळ होती. जर्मन तत्त्वज्ञ मॅक्समुलर संस्कृतचे अभ्यासक होते. लोकमान्य टिळक यांचा मॅक्समुलर यांचेशीही पत्रव्यवहार होत असे. संस्कृत विषय असणारी चर्चा त्यांच्या दोघांच्या या पत्रव्यवहारातून होत असे. ‘द ओरायन’ या पुस्तकातून टिळकांनी ’मृगशीर्ष’नक्षत्राबद्दल माहिती दिली आहे.‘मासानांम् मार्गशीर्षोहम’. मार्गशीर्ष महिन्यात असणारी देव दिवाळी हा प्रथम आस धरून मार्गशीर्ष म्हणजे मी असे देव म्हणतात याचे सुंदर स्पष्टीकरण त्यात केले आहे.
 
 
वरील नमूद केलेल्या लोकमान्य टिळकांच्या प्रसिद्ध पुस्तकातून टिळकांचे वेदांविषयी अध्ययन किती यथोचित होते आणि ते त्यांनी कुशाग्रपणे कसे स्पष्ट केले हे वाचल्यास आपल्या लक्षात येईल. लोकमान्य टिळकांच्या मते ओरायन कालखंड म्हणजेच मृगशीर्ष नक्षत्र हे इ.स.पूर्व ४००० ते इ .स.पूर्व २००० असल्याचे दिसून येते. तर पूर्व मृगशीर्ष नक्षत्र कालावधी इ.स.पूर्व ६००० ते इ .स.पुर्व ४०००० असल्याचे दिसून येते. ऋग्वेदातील स्मृती इ.स. पूर्व ६००० वर्षांपूर्वी रचली गेली असावी असे टिळकांचे मत होते. आर्यांचे मूळ स्थान हे उत्तर ध्रुवीय प्रदेशातील असावे याची स्थाननिश्चिती करताना ऋग्वेदातील ऋचांचा आधार लोकमान्य टिळकांनी घेतला आहे. त्याप्रमाणे त्या काळात उत्तर ध्रुवीय प्रदेशात आपल्या डोक्यावर असलेले अवकाश विश्व गोल फिरताना दिसले असावे आणि म्हणूनच ऋचेमध्ये त्या प्रदेशातील वर्णन आले आहे असे टिळकांनी स्पष्ट केले. संदर्भात दाखल ऋ .१.२४.१०, देवयान पितृयान यातील संदर्भ घेतले. उत्तर ध्रुवीय प्रदेशातील सहा महिने रात्र व सहा महिने दिवस या कालावधीचे वर्णनही वेदांमध्ये वाचावयास मिळतात. त्यातील सहा महिने दिवसाकडे जात असतानाचे वर्णन हे वेदांमधील ऋचा मध्ये ‘भलीमोठी पहाट’ या अर्थी आले आहे. लोकमान्य टिळकांनी संदर्भात दाखलऋ .७.७६.३,आप.श्रौ.२४.१.२ यांचा आधार घेतला आहे. यानंतरच्या होलोसीन कालखंडात आर्यांचे उत्तर धृवीय प्रदेशातून निरनिराळ्या प्रदेशात स्थलांतर झाले असावे. त्यातील काही युरोप व आशिया खंडात वास्तव्यास गेले असावेत असे टिळकांंनी स्पष्ट केले.
 
 
लोकमान्य टिळकांनी केलेल्या या वेदाध्ययनाचा आणि सांख्यकालिकांच्या अभ्यासातून त्यांनी स्वतः स्वतंत्रपणे पंचांगाची निर्मिती केली. त्याला आपण‘टिळक पंचांग’ असे म्हणतो. या पंचांगाचे शोधन कालावधीबाबत मात्र तज्ञांची वेगवेगळी मते आढळून येतात. त्यामुळे इ.स..१९०० ते १९०५ हा कालावधी आपल्याला टिळक पंचांग निर्मितीचा आहे असे म्हणता येईल. शुद्ध पंचांग शके १८४० म्हणजेच ४ मार्च, १९१८ रोजी हे पंचांग प्रचारात आणावे असे टिळकांचे मत होते. असो. थोडक्यात, लोकमान्य टिळकांची महती संपूर्णपणे मांडू शकेल अशी माझी लेखणी समग्र नाही. परंतु लोकमान्य टिळकांचे आतापर्यंत फक्त राजकीय कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. मात्र त्यांचे प्राचीन भारतीय संस्कृतीतील योगदान हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी लोकमान्य टिळकांनी वेदांवरील लिहिलेली पुस्तके वाचणे आणि अभ्यासणे अत्यंत आवश्यक आहे. कारण संस्कृतचे उत्तम ज्ञान आणि ऋग्वेदातील ऋचा यांच्या कालावधीचा अभ्यास आणि सांख्यकालिकातून लोकमान्य टिळकांचा गणिताचा सखोल अभ्यास आणि संबंधित खगोलशास्त्राचा अभ्यास यामुळेच प्राचीन भारतीय संस्कृती आणि भारतीय अस्मिता पुढील पिढीला समजावे यासाठी टिळकांच्या पुस्तकांची ही ढळाश उर्रिीीश्रश संवर्धित करणे आवश्यक आहे.
 
 
- इतिहास अभ्यासक, भोसला मिलिटरी कॉलेज, राम भूमी, नाशिक.
९४२३९१२४००